-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर या फुटीला आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाने केला.
-
नंतर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच आरोप झाले. त्यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली, असा आरोप शिंदे गटाने केला.
-
मात्र, आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपानेच शिवसेनेतील फुटीसाठी ‘ऑपरेशन’ला सुरुवात केल्याचं मोठं विधान केलं आहे.
-
ते जळगावमध्ये एका सभेत बोलत होते. या सभेत गिरीश महाजन यांनी नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…
-
हे खरं आहे की, आम्ही शिवसेनेमधील ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण यात यश येईल यावर आम्हालाही विश्वास बसत नव्हता – गिरीश महाजन
-
मात्र, एकनाथ शिंदे बाहेर निघाले आणि पुढे गेले. बघताबघता सर्व सैन्य त्यांच्यामागे गेलं. शेवटी जमलं. झालं एकदाचं – गिरीश महाजन
-
या सगळ्या गोष्टी जमून आल्या, घडून आल्या. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोक उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले – गिरीश महाजन
-
हे सोपं नव्हतं. शेवटी लोक आले आणि एकनाथ शिंदेंच्या मागे उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यामागे अनेकांचे आशीर्वाद आहेत – गिरीश महाजन
-
आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता – गिरीश महाजन
-
आम्हाला वाटलं होतं की, काही खरं नाही. मधेच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल? – गिरीश महाजन
-
४० लोकं जमा करणं सोपं नव्हतं. कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मात्र सगळे आमच्या पाठिशी उभे राहिले – गिरीश महाजन
-
गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन खरे बोलले त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो, असं म्हटलं.
-
तसेच भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत असा आरोप केला.
-
(सर्व छायाचित्र – संग्रहित आणि गिरीश महाजन फेसबूक पेज)
Photos : “आम्ही ‘ऑपरेशनला’ सुरुवात केली होती, पण…”, शिवसेनेतील फुटीवर गिरीश महाजन यांचं मोठं विधान
भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपानेच शिवसेनेतील फुटीसाठी ‘ऑपरेशन’ला सुरुवात केल्याचं मोठं विधान केलं आहे. ते जळगावमध्ये एका सभेत बोलत होते.
Web Title: Big statement cum claim by bjp minister girish mahajan about shivsena rebel pbs