-
अभिनेत्री कंगना रनौतने भारताला १९४७ नंतर मिळालेलं स्वातंत्र्य भिकेच्या स्वरुपात असल्याचं वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
-
तसेच भारत २०१४ नंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाल्याचा दावा केला. यानंतर मिम्सचा जोरदार पाऊस पडलाय.
-
या मिम्समध्ये कंगना रनौतसोबत भाजपच्या नेत्यावर जोरदार टोलेबाजी केलीय.
-
भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या फोटोंवर उपरोधात्मकपणे भाष्य केल्याचं या मिम्समध्ये पाहायला मिळालं.
-
या मिम्समध्ये भाजपाच्या एका युवा नेत्यानं केलेल्या भारताला केवळ ९९ वर्षांच्या लिझवर स्वातंत्र्य मिळाल्याच्या वक्तव्याचाही संदर्भ देण्यात आलाय.
-
स्मृती इराणी यांच्या आंदोलनाचे जुने फोटो घेऊन त्यावर २०१४ च्या स्वातंत्र्यापूर्वीचं आंदोलन असं म्हणत खोचक टोला लगावण्यात आला.
-
पंतप्रधान मोदी यांचा समुद्रावरील एक फोटो एडीट करून त्यात मोदी मिठाचा सत्याग्रह करत असल्याचं दाखवलं आहे.
-
याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर २०१० मध्ये झालेल्या अटकेच्या कारवाईचा फोटो वापरून त्यांना उपरोधात्मकपणे स्वातंत्र्यसैनिक म्हटलं आहे.
-
२०१४ च्या निवडणुकीआधी भाजपाने महागाई विरोधात केलेल्या जाहिरातींमधील पात्रांचं एक मिम तयार करून त्यात हे सर्व स्वातंत्र्ययोद्धे भूमिगत झाल्याचं खोचक टोला लगावण्यात आलाय.
-
रामदेव बाबा यांच्या न्यूडल्सवरूनही उपहासात्मक टीका करण्यात आलीय.
-
सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या कडकनाथ कोंबड्यांच्या प्रकरणावरून मिम तयार करण्यात आलंय.
-
या मिममध्ये स्मृती इराणी यांच्या आंदोलनांच्या फोटोंचा अनेकदा वापर झालेला पाहायला मिळाला.
-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडीतील फोटोचंही मीम तयार झालंय.
-
भाजपा नेते किरीट सोमय्या २०१४ च्या स्वातंत्र्यलढ्यात रेल रोको आंदोलन करत आहेत असं म्हणत सोमय्या यांच्यावरही निशाणा साधण्यात आला.
-
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना पाण्यातून जाताना पोलिसांनी उचलून घेतल्याचा फोटो मध्यंतरी व्हायरल झालेला. तोही या मिम्समध्ये पाहायला मिळाला.
-
या मिमकरांच्या निशाण्यावरून आमदार गोपीचंद पडळकरही सुटले नाहीत.
-
विशेष म्हणजे मिमकरांनी ब्रिटनच्या राणीचा फोटो वापरून कंगनाच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. (टीप- हे फोटो सोशल मीडियावरील असून त्यांचा ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी कोणताही थेट संबंध नाही.)
Photos : २०१४ च्या स्वातंत्र्याचे मिम्स : माल्या-निरव भारत छोडोचे प्रणेते, तर फडणवीसांचे पहाटेचे प्रतिसरकार, फोटो पाहा…
अभिनेत्री कंगना रनौतने भारताला १९४७ नंतर मिळालेलं स्वातंत्र्य भिकेच्या स्वरुपात असल्याचं वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तसेच भारत २०१४ नंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाल्याचा दावा केला. यानंतर मिम्सचा जोरदार पाऊस पडलाय.
Web Title: Memes on actress kangana ranaut remark on independence after 2014 social media viral post pbs