दक्षिणेतील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद नगण्य आहे. तिथे प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य सर्वाधिक आहे. तमिळनाडूसह दक्षिणेतील सर्वच राज्यांमध्ये आपला शिरकाव करण्याच्या प्रयत्नात भारतीय जनता पार्टी आहे. विशेषत: तमिळनाडूचा विचार करता जात आणि धार्मिक ओळख यांची सांगड घालून या राज्यांमध्ये आपल्या राजकारणाचे बस्तान बसवणे ही तमिळनाडूसाठी भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. ‘ब्राह्मण्यवादी’ आणि उच्च जातीच्या लोकांना अनुकूल अशी भूमिका घेणारा पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची ओळख आधीपासूनच आहे. भाजपा आपल्या याच ओळखीचा उपयोग इथे करताना दिसतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जात आणि धर्मावर आधारित राजकरण

उत्तर तमिळनाडूमधील वेल्लोर, अरक्कोनम, कृष्णगिरी, धर्मपुरी आणि तिरुवन्नमलाई यांसारख्या मतदारसंघामध्ये ‘वन्नियार’ जातीच्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. या निवडणुकीसाठी त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. जातीची अशीच गणिते मांडून तमिळनाडूमध्ये चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न भाजपा करताना दिसत आहे. मात्र, तमिळ संस्कृती, समाज आणि इतिहासाचा अभ्यास करता अशाप्रकारचे राजकारण तमिळनाडूमध्ये तमिळविरोधी आणि अल्पसंख्यांकविरोधी मानले जाते. मात्र, भाजपाने जर ही रणनीती अमलात आणली नाही तर त्यांना इथे प्रवेश करणे जड जाऊ शकते. ही रणनीती वापरून त्यांना इतर अन्य जातींपर्यंतदेखील पोहोचता येऊ शकते. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होईल की राज्यातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा इतिहास पाहता ते त्यांच्या अंगलट येईल, हे पाहणे मात्र निर्णायक ठरेल.

हेही वाचा : पश्चिम बंगालमधल्या तीन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या; कूचबिहार कोण जिंकणार?

भाजपाने आपल्या प्रतिमेमध्ये केली आहे सुधारणा
याच कारणास्तव तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील द्रमुकचे विद्यमान खासदार काथीर आनंद आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी होतील अशी शक्यता तिथल्या रहिवाशांना वाटत नाही. ते या आधी दहावेळा तिथले आमदार राहिले आहेत. मात्र, यावेळी ही निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी कठीण जाऊ शकते. यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकीच एक सर्वांत मोठे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे लढाऊ उमेदवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेमध्ये केलेली सुधारणा होय!

वन्नियार जातीच्या लोकांचं प्रभुत्व तिथे अधिक आहे. ‘पट्टाली मक्कल कच्ची’ (PMK) हा पक्ष या जातीच्या लोकांचे राजकारण करतो, ज्याने भाजपाशी हातमिळवणी केली आहे. एस. रामदास हे या पक्षाचे प्रमुख असून ते वन्नियारांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणीही त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र, भाजपासोबत युती करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही ते अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील भाजपासोबत युतीमध्ये होते.

तमिळनाडूमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न
एआयएडीएमकेच्या स्टार नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर भाजपा तमिळनाडूमध्ये आपली स्वत:ची जागा निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आहे. अखेरीस त्यांना एमजी रामचंद्रन यांचा राजकीय वारसा मिळवण्यात यश आले. हे खरंच आहे की, याआधी भूतकाळात कधीही कोणत्याही द्रविडी पक्षाने भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा व्यक्त केला नाही. तो नेहमीच डावपेचाचा भाग होता, असे मत मद्रास विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख रामू मनीवन्नम यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, “गेल्या काही दशकात राज्यामधील काँग्रेसची झालेली पडझड तसेच इथल्या द्रविडी पक्षांमधील राजकीय नेतृत्वामध्ये झालेली स्थित्यंतरे या सगळ्याचाच अंदाज भाजपाने घेतला होता, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरच भाजपाने आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली होती.”

एमजीआर यांनी स्थापन केलेल्या एआयएडीएमकेसोबत भाजपाची सध्या युती नाही. त्यामुळे या पक्षातील तिहेरी फूट भाजपाला अजिबातच दुखावणारी ठरत नाही. या पक्षामध्ये एडप्पादी पलानीस्वामी, ओ पनीरसेल्वम आणि टीटीव्ही दिनकरन अशी तिहेरी फूट पडली आहे. यातील टीटीव्ही दिनकरन हे भाजपाचे आताचे सहकारी आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या राजकीय परिस्थिती पाहता निश्चितपणे अभूतपूर्व अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी भाजपाला अपेक्षित अशीच आहे. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या प्रतिकाराकडे ते दुर्लक्ष करत आहेत, असे दिसते आहे.

प्राध्यापक मणिवन्नन यांनी पुढे असे सांगितले की, “जातीचा मुद्दा हा मतदान करताना नक्कीच प्रभावी ठरेल. द्रविड सामाजिक सुधारणेची चळवळ ही नक्कीच कौतुकास्पद आहे. या चळवळीमुळे लोकांचा फायदा नक्कीच झाला आहे. मात्र, तरीही हे मुद्दे नक्कीच कळीचे ठरू शकतात.”

ते पुढे म्हणाले की, “इथेच पंतप्रधान मोदींना टीका करण्यासाठी आयती संधी निर्माण झाली. बुधवारी त्यांनी वेल्लोरमध्ये ती केली देखील! भ्रष्टाचारावर द्रमुकचा पहिला कॉपीराइट आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पुढे त्यांनी दावा केला की, केंद्राने पाठवलेले हजारो कोटी रुपये द्रमुकच्या भ्रष्टाचारामुळे खाल्ले जातात.”

‘आरएसएस’च्या कामाचीही होते आहे मदत

तमिळनाडूमध्ये आणखी कोणत्या गोष्टीचा फायदा भाजपाला होत असेल तर ती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शांतपणे केलेलं काम! गेल्या पाच वर्षांमध्ये, तमिळनाडूमध्ये आरएसएसच्या शाखांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सध्या त्यांच्या शाखा या २,४०० हून अधिक आहेत.

याबाबत बोलताना आरएसएसचे दलित कार्यकर्ते एमपी मरियप्पन म्हणाले की, “आम्ही कुठेही समोर येत नाही. मात्र, आम्ही पडद्यामागे शांतपणे काम करतो.” त्यांनी बुधवारी सकाळी मोदींच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील वरधारेड्डीपल्ली पंचायतीपासून वेल्लोर कोट्टई (किल्ला) पर्यंत ४० किमीचा प्रवास केला होता.

मरियप्पन यांनी पुढे असा दावा केला आहे की, आता दलितांची पारंपरिक मतदानाची पद्धत बदलत आहे. ते म्हणाले की, “पूर्वी माझ्या पंचायतीतील अनुसूचित जातीची माणसं द्रमुकला मतदान करायची. आता माझ्या पंचायतीतील १,१४० दलित मतांपैकी ६०० लोक भाजपाला मत देण्याच्या विचारात आहेत.” कोणत्याही पक्षाला जिंकण्यासाठी अनुसूचित जातींची मते महत्त्वाचीच ठरतात. २०११ ची जनगणना असे सांगते की, वेल्लोर जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या २१.८५ टक्के लोक हे अनुसूचित जातीचे किंवा दलित आहेत. इतर सर्वच गावांची परिस्थिती वरधारेड्डीपल्ली पंचायतीप्रमाणेच असेल असे नाही. मात्र, यामुळे किमान भाजपाला इथे शिरकाव करण्यासाठी असलेले अनुकूल वातावरण नक्कीच दिसून येते.

हेही वाचा : ‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?

पंतप्रधान मोदींची द्रमुकवर टीका
परवाच्या प्रचारसभेमध्ये द्रमुकवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा पक्ष म्हणजे एका कुटुंबाची मक्तेदारी असलेली कंपनीच झाली आहे.” ही टीका करताना त्यांनी काँग्रेसलाही बोल लावले. ते पुढे म्हणाले की, “द्रमुककडून निवडणूक लढवायची असेल तर तुमच्याकडे या तीन गोष्टी असणे आवश्यक आहे. त्या म्हणजे कुटुंबाकडून आलेले राजकारण, भ्रष्टाचार आणि तमिळविरोधी संस्कृती! द्रमुकने आपल्या तरुणांना जुन्या राजकारणामध्येच अडकवून ठेवले आहे. त्यामुळे तमिळनाडूतील तरुणांना पुढे पाऊल टाकता येत नाही.” ते उत्तर तमिळनाडूमध्ये भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या प्रचारासाठी या सभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदींनी उत्तर तमिळनाडूतील इतर मतदारसंघातील एनडीए उमेदवारांसाठीही मते मागितली आहेत. यामध्ये पीएमकेचे संस्थापक रामदास यांची सून सौमिया अन्बुमणी, धर्मपुरीमधून रिंगणात उतरलेल्या अन्बुमणी रामदास यांची पत्नी, पीएमकेचे के बाळू, तिरुवन्नमलाईमधून निवडणूक लढवणारे के असुवाथामन या सगळ्यांना द्रमुकविरोधात लढवून भाजपा तमिळनाडूमध्ये शिरकाव करण्याची आपली वाट सुकर करताना दिसत आहे. यासाठी तो धार्मिक ओळख आणि त्याखाली जातीची गणिते मांडताना दिसतो आहे. त्यांना कितपत यश मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp politics in tamil nadu blending caste and faith vsh
First published on: 11-04-2024 at 15:52 IST