जोधपूर शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बसनी बेदान गावातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. गावात नळ बसवल्यानंतर दशकभराची पाण्याची तहान संपेल, असे गावकऱ्यांना वाटत होते. पण हा आनंद अल्पकाळ टिकला. नळांमधून बाहेर पडले ते पाणी नव्हते, तर फक्त हवा होती. या गावकऱ्यांनी आता २६ एप्रिल रोजी जोधपूर मतदारसंघासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान आपली मागणी स्पष्ट केली. पाणी द्या आणि मत घ्या, असंच थेट गावकऱ्यांनी सांगून टाकलं आहे. पाइपलाइन टाकल्या, नळ बसवले, पण पाणी नाही, जवळपास दहा वर्षे झाली. इथली परिस्थिती जराही बदललेली नाही. आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते,” असे रहिवासी मंगला राम सांगतात. पाणी टंचाईचा मुद्दा कोणीही गांभीर्याने घेत नाही. राजकारणी खोटी आश्वासने देतात आणि मग ते सर्व विसरतात,” असे जोधपूर जिल्ह्यातील दुसऱ्या गावात राहणाऱ्या सुशीला सांगतात. त्या पुढे म्हणाल्या की, पाणीपुरवठा हा एकमेव मुद्दा आहे, जो गावातील लोक राजकीय नेते प्रचारासाठी भेट देऊन उपस्थित करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी १००० ते २००० रुपये खर्च करावे लागतात, ज्याचा वापर ते त्यांच्या घरात बसवलेल्या टाक्या भरण्यासाठी करतात. २०२४ असूनही आम्हाला अजून पाणी मिळालेले नाही, असंही पप्पू नावाचा आणखी एक गावकरी सांगतो. शहरांना २४/७ पाणीपुरवठा होत असल्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण इथे १५ दिवस पाणीपुरवठा होत नाही. कोणता पक्ष सत्तेवर येईल याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला फक्त पाणी हवे आहे. जोधपूर आणि शेजारील जिल्ह्यांतील अनेक ग्रामीण भागात अजूनही पाण्याचे संकट बिकट आहे. जोपर्यंत भूजलाचा प्रश्न सोडवला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांना पाणी मिळणे कठीण आहे.

“आम्ही जिथे पाणी साठवतो त्या टाक्याही आता स्वच्छ करणे कठीण झाले आहे. माशी अन् सापदेखील कधी कधी पाण्याच्या टाकीत सापडतात. तेच पाणी आपल्याला पिण्यासाठी आणि आपल्या गुरांसाठी वापरावे लागते. अनेक जण दूध उत्पादक गाई जवळच्या नाल्यातील पाणी पिण्यासाठी सोडतात,” असंही भोंदू कल्लन गावातील राहुल सिंग सांगतात. ग्रामीण भारतातील प्रत्येक घरापर्यंत पाईपद्वारे पाणी कनेक्शन देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम यांसारख्या प्रकल्पांनी लोकांच्या आशा उंचावल्यात. पाण्याच्या प्रश्नावर काम न केल्याचा आरोप असलेले केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे जोधपूरचे खासदार आहेत आणि आता आणखी एक टर्म त्यांना संधी हवी आहे. लोकांच्या पाण्याच्या समस्येतून एक वर्षात सुटका करेन, असंही त्यांनी आश्वासन दिलं आहे.

मी जादूगार नाही, पण तुमची पाण्याची समस्या मी नक्कीच सोडवीन,” असंही शेखावत यांनी जोधपूर जिल्ह्यातील बालेसर गावात लोकांच्या एका गटाला सांगितले. खरं तर राजस्थानमध्ये शेखावत आणि गेहलोत यांच्यातून विस्तवही जात नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गेहलोत राज्याच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. शेखावत यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घरातील नळाला पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जेव्हा काम सुरू झाले, तेव्हा देशातील फक्त १६ टक्के लोकांनाच पाणी मिळायचे. आज ७६ टक्के घरांना पाणी मिळत आहे.

शेखावत यांनी पाण्याच्या अनुपलब्धतेचे खापर राजस्थानमधील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील मागील सरकारवर फोडले आहे. दुर्दैवाने राजस्थानमध्ये गेल्या पाच वर्षांत काँग्रेस सरकारने लोकांच्या तहान भागवण्यापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले. त्यांना आर्थिक मदत आणि संसाधने देऊनही त्यांनी त्यांचे काम केले नाही. त्यांच्या अपयशामुळेच राजस्थान अजूनही पाण्याच्या संकटात सापडले आहेत, असंही शेखावत म्हणाले. जोधपूर लोकसभा मतदारसंघातून शेखावत यांची हकालपट्टी करण्याच्या आशेने विरोधक जोधपूरचा पाणीप्रश्न पेटवून मंत्र्यांना लक्ष्य करीत आहेत. कॅबिनेट मंत्री असूनही ते आपल्या मतदारसंघासाठी काहीही करू शकले नाहीत, संपूर्ण राज्याचा विसर पडला. पाणी हा कळीचा मुद्दा राहिला आहे,” असेही काँग्रेसचे जोधपूरचे उमेदवार करणसिंग उचियार्डा यांनी द प्रिंटला सांगितले.

खासदार शेखावत यांनी ThePrint ला दिलेल्या मुलाखतीत अशोक गेहलोत सरकारने पाणी प्रकल्प रखडवल्याचा आरोप केला. परिणामी जोधपूरमध्ये जलसंकट निर्माण झाले. राज्यातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचले, तर पुढची ५० वर्षे ते पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाहीत, याची काँग्रेसला जाणीव होती. काँग्रेसने राजस्थानच्या लोकांविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना तहानलेले ठेवले,” असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि भाजपामधील या कुरबुरीमुळे जिल्ह्यातील जनता या निवडणुकीत काही तरी बदल घडवून आणेल, अशी आशा बाळगून असल्याचंही शेखावत म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give water get votes attitudes of rural voters thirsty for 10 years of water vrd