काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी सलग चार वेळा रायबरेलीच्या खासदार राहिल्यानंतर राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी रायबरेलीच्या जागेवर पाणी सोडले आहे. पक्षाने १९५१ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. परंतु काँग्रेसचा मतदारसंघाशी असलेला संबंध पाहता रायबरेलीमधून पक्षाचे नवे उमेदवार म्हणून प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव पुढे येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनिया गांधींच्या आधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी रायबरेलीतून तीन वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघाने इंदिरा गांधींचे पती आणि काँग्रेस नेते फिरोज गांधी यांना १९५२ आणि १९५७ मध्ये दोनदा निवडून दिले; तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पणतू अरुण नेहरू रायबरेलीमधून १९८० च्या पोटनिवडणुकीत आणि १९८४ मध्ये विजयी झाले. १९८९ आणि १९९१ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या मेहुणी शीला कौल या जागेवरून विजयी झाल्या. नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्याने १९६२ आणि १९९९ मध्येच केवळ दोनदा ही जागा लढवली नाही. स्वातंत्र्यानंतर तीन वेळा काँग्रेसने रायबरेली गमावली, एकदा आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा जनता पक्षाच्या राज नारायण यांच्याकडून पराभव झाला होता आणि १९९६ आणि १९९८ मध्ये इंदिरा गांधींचे चुलते विक्रम कौल आणि दीपा कौल यांचा भाजपाकडून पराभव झाला होता.

१९५१ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांपैकी केवळ ६ निवडणुकांमध्ये काँग्रेसने या जागेवरून मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. पक्षाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यात सोनिया गांधींनी लढवलेल्या चारही निवडणुकांचा समावेश आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षांनीदेखील या जागेवरून उमेदवाराने जिंकलेल्या सर्वाधिक मतांची नोंद केली आहे. २००९ मध्ये ज्या वर्षी यूपीए सरकार केंद्रात सत्तेवर परतले होते, त्या वर्षी ७२.२ टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी १९९६ आणि १९९८ मध्ये झाली होती, जेव्हा त्यांना १० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली होती. पण १९९९ मध्ये राजीव आणि सोनिया गांधींचे जवळचे आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत सतीश शर्मा निवडून आले, तेव्हा काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले. २००० च्या दशकात समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) हे रायबरेलीमध्ये काँग्रेसचे प्रमुख प्रतिस्पर्धी असताना २०१४ पासून भाजपा मतांच्या टक्केवारीत दुसऱ्या स्थानी आहेत. २०१४ मध्ये २१.१ टक्के मते मिळवून ३८.७ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाने जागा लढवली नाही.

हेही वाचाः Rajya Sabha Election: राज्यसभेत २८ पैकी २४ नव्या चेहर्‍यांना संधी; लोकसभेसाठी भाजपाची मोठी रणनीती

लोकसभेची जागा काँग्रेसकडे कायम राहिली असली तरी अलीकडच्या काळात त्यांच्या विधानसभा क्षेत्रात चित्र वेगळे आहे. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातील सर्व ५ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचा फक्त पराभवच झालेला नव्हे, तर चौथ्या जागेवर ते तिसरे आणि पहिल्या जागेवर मतांच्या टक्केवारीत ते चौथ्या स्थानावर फेकले गेले. या ४ जागांपैकी सपा १ जागेवर विजयी झाली आणि भाजपाने काँग्रेसच्या एका माजी आमदाराला उमेदवारी दिली होती. तो विजयी झाला. ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला फक्त १३.२ टक्के मते मिळाली, समाजवादी पार्टीला ३७.६ टक्के आणि भाजपाला २९.८ टक्क्यांच्या मतांवर समाधान मानावे लागले.

हेही वाचाः भाजपला ५५ टक्के तर काँग्रेसला १० टक्के मदत निवडणूक रोख्यांतून

रायबरेली जागेचे निकाल हे उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या कमी होत चाललेल्या प्रभाव दाखवते. २०२२ मध्ये पक्षाला विधानसभेच्या फक्त २ जागा आणि २.३ टक्के मते मिळाली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २ विधानसभा जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सपा सत्तेवर आली होती आणि मोदी लाट अजून सुरू व्हायची होती, तेव्हा रायबरेलीतील ५ पैकी ४ जागा नवोदित पीस पार्टी ऑफ इंडियाने जिंकल्या होत्या. सपाला ५ विभागांमध्ये एकत्रित ३०.८ टक्के मते मिळाली होती, तर काँग्रेस २१.७ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तर भाजपा ३.१ टक्क्यांसह पिछाडीवर होता. रायबरेलीच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये खराब कामगिरी असूनही काँग्रेसने २८ जागा आणि ११.७ टक्के मते जिंकून यूपीमध्ये एकूणच चांगली कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi gives up claim on rae bareli lok sabha constituency will congress lose seats vrd