scorecardresearch

बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) हा एक राजकीय पक्ष असून बहुजनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची स्थापना झाली होती. कांशीराम यांनी १९८४ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या (BSP) उद्दिष्टाचा दावा करतो. कांशीराम यांनी २००१ मध्ये मायावती यांना बहुजन समाज पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मायावती या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.


बहुजन समाज पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे. पक्षाची चारवेळा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाली आहे. चारहीवेळा मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. १९९५, १९९७, २००२ आणि २००७ साली बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. पक्षाला २००७ च्या विधानसभा निवडणुकीत २०६ जागांवर यश मिळाले होते. मात्र २०१२ मध्ये पक्षाला केवळ ८० जागा मिळाल्या. मायावती यांचे सरकार पडले आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागांवर यश मिळाले. परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांना या जागा टिकवता आल्या नाही. तसेच या पक्षाला निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. त्याचबरोबर पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील मतांची टक्केवारी देखील खालावली होती.


Read More
bsp-to-contest-ratnagiri-zilla-parishad-panchayat-samiti-elections
रत्नागिरी जिल्ह्यात बसपा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका स्वबळावर लढणार; जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चेंडे यांनी केले स्पष्ट

रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चेंडे यांनी स्पष्ट…

BJP Yavatmal majority,Yavatmal municipal election results,Yavatmal City Development Alliance,Nitin Giri Yavatmal,Yavatmal municipal corporation news,Yavatmal BJP alliance,Prahar BSP alliance Yavatmal,
यवतमाळ नगर परिषदेत शहर विकास आघाडीचा प्रयोग; भाजपला प्रहार, बसपा आणि अपक्षाची साथ

यवतमाळ नगर परिषदेत भाजपला नगराध्यक्ष पदासह एकहाती बहुमत मिळाले. मात्र भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसपा आणि…

Bahujan Samaj Party inviting applications from aspirants for Dhule Zilla Parishad and Dhule Municipal Corporation elections
BSP:बहुजन समाज पक्षाची आगामी निवडणुकीत…धुळे जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांची मोठी घोषणा

जिल्हा परिषद आणि धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.

मायावतींनी अवघ्या एकाच वर्षात घर का सोडलं? काय आहे नेमकं कारण?

मायावतींनी अशा प्रकारे निवासस्थाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबद्दल बसपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले होते. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा…

आकाश आनंद मायावतींचे राजकीय वारसदार? बसपाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी निवड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पक्षाच्या कामात आकाशला आशीर्वाद आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

बसपातलं नाराजी नाट्य संपुष्टात, मायावतींचा पुतण्या आकाश याची घरवापसी

आकाश यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काही तासांतच मायावतींनी त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. असं असताना ही संधी त्यांना…

Akash Anand Apologizes to Mayawati
Akash Anand Apologize: ‘मला क्षमा करा, परत सासऱ्याचं ऐकणार नाही’, मायावतींच्या पुतण्याचा माफीनामा; पक्षात परत घेतले जाणार?

Akash Anand Apologizes to Mayawati: बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या पुतण्याने एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांची जाहिर माफी मागितली…

पक्षांतर्गत बैठकीत देणग्या न मागण्याचा निर्णय, बसपाच्या फंडिंगचं गणित कसं जुळवणार मायावती…

मागच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसपाचा दारुण पराभव झाला होता. पक्षाला या निवडणुकीत आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. त्यानंतर पक्षानं आर्थिकदृष्ट्या…

BSP Politics
BSP Politics : मायावती अ‍ॅक्शन मोडवर; पक्षात केले फेरबदल, बंधू आनंद कुमारांच्या जागी रणधीर बेनीवाल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पुन्हा एकदा मायावतींनी पक्षात बदल करत अचानक मोठा निर्णय घेतला आहे.

जिवंत असेपर्यंत उत्तराधिकारी नाही; मायावतींनी घोषणा करत भाच्याला सर्व पदांवरून केलं मुक्त

नव्या नियुक्तीनुसार आनंद कुमार हे दिल्लीतील कॅम्प पाहतील आणि रामजी गौतम हे देशभर पक्षाच्या समर्थकांशी संपर्क साधतील अशी माहिती मिळत…

BSP chief Mayawati Akash Anand
मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंद यांची सर्व पदांवरून हकालपट्टी; कारण काय? राजकीय उत्तराधिकाऱ्याबाबत मोठं भाष्य

BSP chief Mayawati : मायावती यांचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

संबंधित बातम्या