यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर पक्षाला गेल्या वेळेपेक्षा ३७० अतिरिक्त मते मिळवायची आहेत. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी, असे राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर काही दिवसांनी भाजपाने तळागाळातील मतदारांना आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले. याच पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर प्रदेश आणि इतर काही मध्यवर्ती राज्यांमध्ये ‘मिलन समारंभ’ आयोजित करण्यासही सुरुवात केली. १२ फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशमधील ४०३ विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांसह ८८ हजारांहून अधिक लोक माणसं सहभागी झाल्याचा दावा भाजपाने केला आहे.

उत्तराखंडमध्ये या कार्यक्रमात काँग्रेस, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पक्ष (बसप) आणि उत्तराखंड क्रांती दल (यूकेडी) च्या सहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट हेदेखील ५ मार्चपासून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, मिलन समारंभाच्या माध्यमातून पक्षात सामील होणाऱ्या सदस्यांपैकी बूथ स्तरावरील विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामप्रधान, माजी जिल्हा पंचायत पदाधिकारी, नगरसेविका आणि मागील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांचा समावेश आहे.

हजारोंच्या संख्येने पक्ष प्रवेश

“आम्ही अशा कार्यकर्त्यांची ओळख पटवली, ज्यांचा मागील निवडणुकीत सपा, बसपा आणि काँग्रेसला लाभ झाला. या पक्षांतील बूथ कार्यकर्त्यांचे परिसरातील मतदारांशी वैयक्तिक संबंध आहेत. जर ते आमच्यासोबत आले, तर त्यांच्या सहाय्याने मतदानाच्या दिवशी भाजपाची मते वाढवतील”, असे एका भाजपा नेत्याने सांगितले. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील मतदारांवर प्रभाव टाकणारे रेशन विक्रेतेही भाजपामध्ये सामील झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष ब्रज बहादूर म्हणाले, “सर्व विधानसभा जागांवर मिलन समारंभ सुरू करण्यात आला आहे आणि आतापर्यंत ८८ हजारांहून अधिक लोक भाजपामध्ये सामील झाले आहेत. पक्षात केवळ स्वच्छ प्रतिमा असलेल्या लोकांचाच समावेश केला जाईल, यासाठी प्रादेशिक आणि जिल्हा स्तरावर कसून तपासणी केली जात आहे. पक्षाचे नुकसान होईल अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. त्यांच्या परिसरातील तीन किंवा चार मतदारांशी वैयक्तिक संबंध असलेले मैदानी कार्यकर्ते पक्षात सामील होत आहेत.”

बहादूर म्हणाले की, शिक्षक, विविध जाती-जमातींचे नेते, वकील आणि इतरांना भाजपामध्ये सामील केले जात आहे. गाझियाबाद येथील काही भागांत भाजपामध्ये सामील झालेल्यांपैकी स्थानिक व्यापारी संस्थांचे पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक, विरोधी पक्षातील कार्यकर्ते, तसेच सेवानिवृत्त सरकारी अधिकार्‍यांचा यात समावेश आहे. सपाचे प्रभुत्व असलेल्या इटावामधून बूथ अध्यक्ष, ग्रामप्रधान आणि रेशन विक्रेते असे १४०० हून अधिक लोक वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील मिलन समारंभातून भाजपामध्ये सामील झाले आहेत, असा दावा भाजपाने केला आहे. सपाचे ज्येष्ठ नेते आणि सहा वेळा आमदार राहिलेले शिवपाल सिंह यादव यांचा मतदारसंघ असलेल्या जसवंत नगरमधील ३०० लोकांनी पक्षात प्रवेश घेतला आहे.

भाजपा प्रवेशाचे कार्यक्रम लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरूच राहणार असल्याचे बहादूर यांनी सांगितले. “भाजपला बूथ स्तरावर पाठिंबा मिळवून देणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आमचे विरोधक कमी होतील आणि भाजपाची मते वाढतील. मागील निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर जितकी मते मिळाली होती, त्यापेक्षा ३७० अधिक मते मिळवण्याचे आमचे ध्येय आहे.” ते म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी तिकिटे मिळवण्यासाठी लहान पक्षांसह विरोधी पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते, आमदार भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

उत्तराखंड भाजपाचे सरचिटणीस आदित्य कोठारी म्हणाले, “राज्यात आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लोक भाजपामध्ये सामील झाले आहेत. निवृत्त सरकारी अधिकारी, इतर पक्षांचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Loksabha Election: कर्नाटक काँग्रेससमोर भाजपा-जेडीएस युतीचे आव्हान, सिद्धरामय्या-शिवकुमार यांची जोडी निवडणुकीसाठी तयार

डेहराडून येथील राज्य भाजपा मुख्यालयात झालेल्या अशाच एका कार्यक्रमात काँग्रेस, सपा, बसप आणि यूकेडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. या कार्यक्रमात ढोल वाजवत फटाके फोडण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री धामी आणि महेंद्र भट्ट ५ मार्चपासून विविध विधानसभा मतदारसंघात एकत्र फिरणार आहेत.