Karnataka Congress for Loksabha Election राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) कोट्यधीश उमेदवाराचे नाव जाहीर केले होते. कूपेंद्र रेड्डी यांची निवड होईल असा विश्वास जेडी (एस)ला होता. भाजपा-जेडी (एस) राज्यसभा निवडणुकीत चांगले प्रदर्शन करतील असा अंदाज वर्तवला जात होता. “क्रॉस व्होटिंग होणार नाही याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागेल. जे आमदार संतुष्ट नाहीत त्यांना लाभ मिळवून देण्याची ही चांगली वेळ आहे”, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने जेडीएस उमेदवार डी. कूपेंद्र रेड्डी यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न

हिमाचल प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत जे झाले त्याच्या विपरीत घडले. भाजपाच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या अजय माकन, सय्यद नसीर, जी. सी. चंद्रशेखर यांनी बाजी मारली. भाजपाचे नारायण बंदिगेदेखील निवडणुकीत विजयी झाले. परंतु, जेडीएसच्या कूपेंद्र रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांना खूश ठेवण्यात सिद्धरामय्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनीही आमदारांना बांधून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

गेल्यावर्षी मंत्रिमंडळात स्थान मिळू न शकलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी पसरली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींनी २६ जानेवारीला ३४ आमदारांची राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या मंडळे आणि महामंडळांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच आठ नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. आमदारांच्या शिफारशींवरून तितक्याच कार्यकर्त्यांना राज्य प्रशासनात पदेही देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा फायदा यंदा राज्यसभा निवडणुकीतदेखील झाल्याचे मानले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे शिवकुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे राहुल गांधींचे सहकारी अजय माकन, मल्लिकार्जुन खरगे यांचे सहकारी नासीर हुसेन आणि काँग्रेसचे जुने नेते जी. सी. चंद्रशेखर यांना राज्यसभेतील जागा राखण्यात यश आले. शिवकुमार यांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी सर्व १३४ काँग्रेस आमदारांना एका रिसॉर्टमध्ये एकत्र आणले. त्यांना मॉक-व्होटिंग सत्रांद्वारे योग्यरित्या मतदान करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. भाजपाचे माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्यासह चार अपक्ष आमदार काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देतील याची खातरजमाही शिवकुमार यांनी केली.

कूपेंद्र रेड्डी यांच्यावर लाच घेण्याचा आरोप

याच दरम्यान कूपेंद्र रेड्डी यांनी मतांसाठी अपक्ष आमदार लता मल्लिकार्जुन, पुट्टास्वामी गौडा आणि दर्शन पुत्तनय्या यांना लाच दिल्याचा आरोप करून शिवकुमार यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनी एफआयआर दाखल केली. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार काँग्रेसने आपल्या बाजूने घेतले. यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले एस. टी. सोमशेखर आणि शिवराज हेब्बर यांनी काँग्रेसला मतदान केले. माकन आणि नासीर हुसेन यांना प्रत्येकी ४७, तर चंद्रशेखर यांना ४५ मते मिळाली. भाजपाचे विजयी उमेदवार नारायण बंदिगे यांना ४७, तर जेडीएसचे कूपेंद्र रेड्डी यांना केवळ ३६ मते मिळाली.

शिवकुमार यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा नसला तरी ते पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्यास ते उत्सुक आहेत. सिद्धरामय्या यांना १३५ पैकी जवळपास १०० काँग्रेस आमदारांचा पाठिंबा लाभला, ज्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना मे २०२३ मध्ये दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री केले.

हेही वाचा : “शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित”; भारतीय किसान संघाची टीका, आंदोलकांपासून दूर राहण्याचा सरकारला दिला सल्ला

शिवकुमार यांनी कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यास मदत केल्यामुळे, त्यांना बुधवारी हिमाचल प्रदेशातील स्थिती हाताळण्यासाठी पाठवण्यात आले. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेची जागा गमावल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. कर्नाटक काँग्रेसच्या राज्यसभेतील रणनीतीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka congress siddaramaiah d k shivakumar for loksabha election rac
First published on: 01-03-2024 at 08:30 IST