पुण्याच्या टेकडय़ांवर झाडे लावणे हा पुणेक र निसर्गप्रेमींच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. लोकांच्या सहभागातून वनविभागाच्या जमिनीवर झाडे लावण्याचा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नव्याने सुरू होत असून केवळ देशी वृक्षच नव्हे, तर त्यातही विशिष्ट संकल्पनांवर आधारित वने फुलवण्यास पुणेकर हातभार लावू शकणार आहेत.
पुण्याच्या वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरी भागात २,३२० हेक्टर वनक्षेत्र आहे. ‘नागरी वनउद्यान’ योजनेअंतर्गत या वनक्षेत्रावर लोकसहभागातून वनीकरण करण्यात येणार आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक ठिकाणी विशिष्ट संकल्पना घेऊन त्याच्याशी संबंधित झाडे लावण्यात येणार आहेत. यात नागरिकांच्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावलेल्या झाडांचे स्मृतिवन, औषधी वनस्पतींचे चरकवन, गौतम बुद्धांशी संबंधित वृक्षांचे बोधिवन, गणपती बाप्पांना आवडणाऱ्या २१ पत्रींकरिता लागणाऱ्या वनस्पतींचे ‘गणेशवन’ अशी विविध प्रकारची वने फुलणार आहेत. निसर्गप्रेमींना विविध वनसंकल्पनांची ओळख करुन देण्यासाठी या प्रकारे वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी व्ही. डी. सूर्यवंशी यांनी गुरूवारी दिली.  
या वनांमध्ये वेगवेगळ्या फुलांचा हंगाम असलेल्या वृक्षांची डोंगर उतारावर लागवड करता येणार आहे. फुलांच्या प्रजातीनुसार ही वने पीतवन, ताम्रवन, नीलवन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातील. वड, पिंपळ, उंबर, पिपरण आणि नांदुरकी या वृक्षांच्या लागवडीसाठी ‘पंचवटी’ या संकल्पनेअंतर्गत देखील वृक्ष लावण्यात येणार आहेत.
वारजे येथील टेकडीवर चार हजार झाडे लावून या योजनेचा आरंभ करण्यात येणार असून ६ जूनला सकाळी ८.३० वाजता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, वाढदिवसाप्रीत्यर्थ किंवा जीवनातल्या कडू-गोड आठवणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे शुल्क भरुन नागरिक आपल्या आवडीचे झाड लावू शकणार आहेत. समितीच्या ‘४८९४०२०१०९१५५७४’ या क्रमांकाच्या युनियन बँक खात्यावर २ हजार रुपये शुल्क भरुन नागरिक या उपक्रमात आपला वाटा उचलू शकतील, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दगडांच्या खाणींचेही सुशोभीकरण करणार
शहरी वनक्षेत्रात असलेल्या लहान-मोठय़ा दगडखाणींचे सुशोभीकरण करण्यात येणार असून खाणीतील गाळ काढून बांधबंदिस्ती केल्यामुळे पाणीसाठा वाढेल, असे वन विभागाने म्हटले आहे. या पाण्याचा उपयोग रोपांना पाणी देण्यासाठी तसेच वन्य पशूपक्ष्यांनाही होईल. रोपवनांचे संरक्षण करणाऱ्यांसाठी संरक्षण कुटी आणि भोवतालाचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण मनोरा उभारण्यात येणार आहे.

pregnant woman, water tank,
धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीला पाण्याच्या टाकीत….
mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात