Discovery of a new crystalline compound of cardiovascular drug | Loksatta

हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध; हैदराबाद विद्यापीठाचे संयुक्त संशोधन

एंट्रेस्टो या औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. हृदयविकारावरील हे औषध जगात सर्वाधिक विकले जाते.

हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध; हैदराबाद विद्यापीठाचे संयुक्त संशोधन
हृदयविकारावरील औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध

हृदयविकारामध्ये वापरल्या जाणाऱ्या एंट्रेस्टो या औषधाच्या नव्या स्फटिकरूपी संयुगाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि हैदराबाद विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून नवे बहुरूप हाती आले असून, एंट्रेस्टोचे सहा स्फटिकरूपीय सहा वेगवेगळे प्रकाश शोधण्यात आले.

हेही वाचा- वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरेंच जनआक्रोश आंदोलन 

एनसीएलने २०१८ मध्ये नवीन स्फटिकरूपीय हायड्रेट संरूपे आणि एंट्रेस्टोच्या विविध संरचनांवर संशोधन सुरू केले होते. एनसीएलचे तत्कालीन संचालक डॉ. अश्विनीकुमार नांगिया, रसायनशास्त्र विभागातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजेश गोन्नाडे यांनी या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री जर्नल या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले. स्फटिकरूपी संयुगामध्ये पाण्याचे प्रमाण भिन्न असून वलसार्टन, सॅक्युबिट्रिल क्रियाशील फार्मास्युटिकल घटक (एपीआय) त्यांच्या अनायनिक अवस्थेत सोडियम आयनसोबत बंधित आहेत. एंट्रेस्टोच्या विविध प्रकारांमध्ये २.० ते ३.२ टक्के पाणी असते. ते वेगवेगळ्या तापमान आणि आर्द्रतेमध्ये स्थिरता दाखवते. त्यामुळे ते त्यांच्या दीर्घकालीन साठवण, जैवउपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्या सुपरमोलेक्युलर ड्रग कॉम्प्लेक्सने पावडर एक्स-रे डिफ्रॅक्शन (पावडर क्ष-किरण विवर्तन), औष्णिक मोजमाप आणि स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रांद्वारे पॉलिमॉर्फ आणि हायड्रेट संरचनेचे वर्णन करताना विलक्षण आव्हाने निर्माण करते. आता संशोधकांसमोर एंट्रेस्टोची आण्विक पॅकिंग व्यवस्था, पाण्याशी क्रियात्मकता समजून घेणे, त्याची स्फटिकीय संरचना निश्चित करण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा- शाश्वत विकासाची उद्दिष्टे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवावीत – मुख्यमंत्री

एंट्रेस्टो हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे औषध

एंट्रेस्टो हे गंभीर रुग्णांमध्ये दीर्घकालीन हृदयविकार, त्या संबंधातील समस्येच्या उपचारांसाठी निर्माण केलेले जगातील सर्वाधिक विकले जाणारे औषध आहे. या औषधाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने २०१५ मध्ये मान्यता दिली. हे औषध सॅक्युबिट्रिल आणि व्हॅलसर्टनचे पॉलिमॉर्फ सुपरमोलेक्युलर कॉम्प्लेक्स असलेल्या इतर औषधांपेक्षा वेगळे आहे. बाजारातील बहुतेक औषधे हे एकच रेणू असणारे आहेत आणि काही ठरावीक मात्रा असणारे आहेत किंवा एकापेक्षा अधिक औषधांचे मिश्रण असणारे आहेत. एंट्रेस्टो हे औषध स्फटिकीय अभियांत्रिकी तत्त्वे, औषधोत्पादन संबंधित कॉक्रिस्टल्स वापरून डिझाइन केलेले तसेच २००० च्या दशकात एकस्व अधिकार मिळणारे पहिले औषध आहे. हे औषध घन अवस्थेतील एकापेक्षा जास्त स्फटिकीय स्वरूपात अस्तित्वात असू शकते. त्याचा परिणाम असा, की हे औषध टॅबलेट स्वरूपात निर्माण करून विद्राव्यता, पारगम्यता आणि शरीरातील शोषण क्रियेकरिता उपयुक्त ठरते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे शहरात लहान मुले पळविणारी टोळीची अफवा; खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

संबंधित बातम्या

पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
पुणे : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी पिंपरी-चिंचवड बंदचे आवाहन
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
हिरवा कोपरा : परंपरागत ठेवा देवराई
पुणे : मेट्रोची भूमिगत मार्गामध्ये चाचणी यशस्वी; रेंजहिल डेपो ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकापर्यंतचे काम पूर्ण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मतभेद बाजूला सारून लाडक्या लेकासाठी मलायका अरबाज आले एकत्र; नेटकरी म्हणाले…
पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना; प्रशासनाकडून आज प्रत्यक्ष पाहणी
अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनाबद्दल प्रियांका चोप्राने व्यक्त केली नाराजी; म्हणाली…
IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का, वर्ल्ड कपसाठी भारताने व्हिसा देण्यास दिला नकार
शिंदे सरकारला ‘नामर्द’ म्हणणाऱ्या राऊतांना शंभूराज देसाईंचा इशारा; म्हणाले, “तोंड आवरावं, अन्यथा पुन्हा…”