Premium

‘पिंपरीत घड्याळ, वेळ आणि मालकही तेच…’ , अशी घोषणाबाजी करत शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपरी चौकातील पक्ष कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Pimpri- Chinchwad city Sharad Pawar group, state president Jayant Patil strong show strength
'पिंपरीत घड्याळ, वेळ आणि मालकही तेच…' , अशी घोषणाबाजी करत शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन! (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

घड्याळ ही तेच, वेळ ही तीच आणि…मालक ही तेच फक्त साहेब…अस ब्रीदवाक्य घेऊन आज पिंपरी- चिंचवड शहरात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पिंपरी चौकातील पक्ष कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शहराध्यक्ष तुषार कामठे, शहरातील जेष्ठ नेते आझम भाई पानसरे, शिलवंत धर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपरी चौकात जयंत पाटील यांच्या हस्ते शरद पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा अध्याय सुरू झाला. पिंपरी- चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालेकिल्ला आहे असं नेहमीच म्हटलं जातं. याठिकाचे बहुतांश पदाधिकारी, नगरसेवक हे अजित पवार गटासोबत गेलेले आहेत. अस असलं तरी आता थेट शरद पवार गट हा शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या माध्यमातून शह देण्यास तयार झाला आहे. शरद पवार गट खऱ्या अर्थाने आता ऍक्टिव्ह झाला आहे असं म्हणावं लागेल. कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी शेकडो कार्यकर्ते होते. अनेकांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad city sharad pawar groups state president jayant patil made a strong show of strength kjp 91 dvr

First published on: 02-12-2023 at 21:23 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा