दादासाहेब भगत हा मुळचा बीडचा. शेतकरी कुटुंबातील दादासाहेब भगत हा तरुण त्याच्या शार्क टॅंक इंडियातील सहभागामुळे चर्चेत आला आहे. ‘बोट’ सारख्या नामांकित कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडून त्याला १ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ऑफर मिळाली आहे. दहावीनंतर आयटीआयचं शिक्षण घेतलेला दादासाहेब २००६ साली इन्फोसिस कंपनीत ऑफिस बॅाय म्हणून कामाला होता.

तिथे असताना संगणकावर केली जाणारी कामं पाहून त्यानेही ग्राफिक्स डिझायनिंग, प्रोग्रामिंग शिकून घेतलं. दरम्यान एका अपघातामुळे त्याला गावी परतावं लागलं. मात्र इथेच तो थांबला नाही तर design template.io नावाचं स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. गावातील मित्रांबरोबर दादासाहेबने आपलं छोटं ऑफिस चक्क गोठ्यातच थाटलं होतं. आज पुण्यात ३० ते ३५ जणांच्या टीमसह त्याचं काम सुरू आहे. दादासाहेबच्या या कामाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात घेत स्टार्टअपचं कौतुकही केलं होतं. त्याचा हा असामान्य प्रवास जाणून घेऊया.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys office boy became a founder of two startups inspiring story of dadasaheb bhagat pune pck
First published on: 04-04-2024 at 11:34 IST