Premium

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम; दोन वर्षांनी लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांचा कल 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदल २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांनी कल असल्याचे ऑनलाइन सर्वेक्षणातून दिसून आले.

mpsc
संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदल २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांनी कल असल्याचे ऑनलाइन सर्वेक्षणातून दिसून आले. नवी पद्धत २०२५पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीने जवळपास दहा वर्षांनी राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका आता वर्णनात्मक स्वरुपाच्या होणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवरच आता राज्यसेवेची परीक्षा योजना वर्णनात्मक पद्धतीची करण्यात आली आहे. २०२३पासून या बदलाची अंमलबजावणी होणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नवा अभ्यासक्रम आणि नवी परीक्षा योजना याबाबतचा कल जाणून घेण्यासाठी एमपीएससी स्टुडंट राइटतर्फे समाजमाध्यमाद्वारे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास १० हजारांहून अधिक उमेदवारांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. प्रतिसाद नोंदवलेल्या उमेदवारांपैकी ७६ टक्के उमेदवारांचा कल २०२४-२५पासून नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लागू करण्याकडे असल्याचे दिसून आले. तर २४ टक्के उमेदवारांनी २०२३पासूनच या बदलांची अंमलबजावणी व्हावे असे मत नोंदवले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc new syllabus 76 per cent candidates apply pune print news ysh

First published on: 05-07-2022 at 17:37 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा