परस्परविरोधी दाव्यामुळे संभ्रमाचे वातावरण
भोसरीतील बहुचर्चित ‘गोल्डमॅन’ दत्तात्रय फुगे यांचा आर्थिक गैरव्यवहार व पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून झाला. सोन्याच्या शर्टमुळे ते चर्चेचा आणि तितकाच टीकेचा विषय बनले होते. त्यांच्या खुनानंतर अवघ्या तीनच दिवसांत सोन्याचा शर्ट पुन्हा चर्चेत आला आहे. हा सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्सच्या ‘ताब्यात’ असून त्यांनी अवाच्या सवा व्याज लावून आपल्याकडे ठेवून घेतल्याचा आरोप गोल्डमॅनचा मुलगा शुभम फुगे याने केला आहे. तर, रांका यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
चिंचवड येथील रांका ज्वेलर्स यांच्याकडून फुगे यांनी साडेतीन किलो वजनाचा शर्ट तयार करून घेतला, त्यासाठी एक कोटी दोन लाख रुपये खर्च आला होता. या शर्टवरून नव्याने वाद सुरू झाला आहे. २०१३ मध्ये प्राप्तिकर विभागाचा छापा पडला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे दिला होता. त्यानंतर, पैशाची गरज होती म्हणून काही रक्कम रांका यांच्याकडून घेतली. मात्र, त्याचे अवाच्या सवा व्याज लावण्यात आल्याचा दावा शुभमने केला आहे. जेवढे पैसे घेतले होते, ते परत देण्यास तयार असतानाही रांका यांना मात्र ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शर्ट परत दिला नाही. त्यामुळे रांका यांच्याविरोधात वडिलांनी न्यायालयीन लढा सुरू केला, तो आपण पुढे चालवणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.
यासंदर्भात, रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले, की हा स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रकार आहे. शुभम फुगे असे चुकीचे का बोलतो आहे, कळायला मार्ग नाही. दत्तात्रय फुगे यांनी शर्ट बनवून घेतला, सर्व व्यवहार धनादेशाद्वारे झाले आहेत. आता काही संबंध राहिलेला नाही. २०१३ नंतर तो शर्ट आमच्याकडे दिल्याचे तो मुलगा सांगत आहे. मात्र, त्यानंतरही तो शर्ट दत्तात्रय फुगे यांनी अनेकदा घातला होता. त्यामुळे शुभमच्या म्हणण्याला काही अर्थ नाही.
वाचा – दत्ता फुगे खूनप्रकरणात नऊ आरोपींना अटक

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…