पुणे : परम दशसहस्र महासंगणकाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलत संगणकशास्त्र क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. श्री कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी डॉ. भटकर यांची निवड केली आहे. पुण्यभूषण पुरस्काराचे यंदा ३६ वे वर्ष असून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सीमेवर लढताना जखमी झालेल्या चार जवानांसह वीरमातेला गौरविण्यात येणार आहे, असे त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी शुक्रवारी दिली.