राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नास्तिक म्हटलं जातं. याचं खंडन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आळंदीत केलं. आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीनिवास पाटील म्हणाले, मी नेवासा येथील मंदिरावर गुलाबाच्या पाकळ्या टाकण्यास सांगितल्या होत्या. पवार साहेबांनी फोन करून सांगितलं मी गुलाबाच्या पाकळ्या देहूतही टाकल्या आहेत. शरद पवार यांना नास्तिक म्हणतात, असं म्हणत शरद पवार हे नास्तिक आहेत याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील यांनी वारकऱ्यांच्या समोर खंडन केलं.

हेही वाचा – शरद पवार यांचे सूचक विधान, म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण…’

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नास्तिक आहेत. अशी नेहमीच चर्चा रंगते. परंतु, शरद पवार हे वारंवार आळंदी असेल किंवा देहू असेल या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. अनेकदा वारकऱ्यांच्या कार्यक्रमात भजन कीर्तनात शरद पवार हे तल्लीन झालं तेदेखील बघायला मिळालं. आजदेखील शरद पवार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या स्थळी नतमस्तक झाले. देवस्थान यांच्याकडून तुळशीहार आणि ज्ञानोबांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. या आधीदेखील देहूत तुकोबांच्या चरणी ते नतमस्तक झाल्याचं सर्वांनी पाहिलेल आहे. तरीदेखील शरद पवार हे नास्तिक आहेत, असं वारंवार म्हटलं जातं.

हेही वाचा – अजित पवार म्हणाले, सर्वांनी ‘ही’ सवय लावून घ्यायला हवी…

आज आळंदीमधील भागवत वारकरी संमेलनाच्या निमित्त खासदार श्रीनिवास पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार हे नास्तिक आहेत याचं खंडन करत उदाहरण दिलं. श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जवळचे मानले जातात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is not an atheist says mp srinivas patil kjp 91 ssb