पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीसाठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्या धर्तीवर राज्य मंडळाकडून येत्या काळात ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार केला जाणार आहे.

 राज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तके, मार्गदर्शक साहित्याचा वापर करण्याची मुभा असते. सीबीएसईकडून ओपन बुक परीक्षा पद्धत वापरण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धत वापरून, त्याचे फायदे, तोटे, मर्यादा यांचे मूल्यमापन केल्यानंतर सीबीएसईकडून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state board will also test the open book examination system ccp 14 amy
First published on: 29-02-2024 at 21:21 IST