तुम्हाला पिठलं आवडतं का? तुमचे उत्तर होय असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला आज दही पिठलंची रेसिपी सांगणार आहोत. महाराष्ट्रात दही पिठलं आवडीने खाल्ले जाते. हे दही पिठलं चवीला कढी सारखे लागते. ज्यांना कढी आवडते त्यांनाही हे पिठलं नक्की आवडले. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी

दही पिठलं रेसिपी

साहित्य

बेसन एक वाटी
दही एक वाटी
कांदा दोन नग
टोमॅटो एक नग
हिरवी मिरची १०ते १२ नग
लसूण पेस्ट एक चमचा
कोथिंबीर आवडीनुसार
कढीपत्ता आवडीनुसार
लाल तिखट अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
मोहरी अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तेल दोन पळी
पाणी

हेही वाचा – हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच

हेही वाचा – हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच

दही पिठलं कसे बनवावे?

प्रथम एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घ्या. त्यात एक वाटी दही घ्या. दोन्ही व्यवस्थित फेटून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करात त्यात जिरे, मोहरी, वाटलेली मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट टाकून चांगले परतून घ्या. त्यात टोमॅटो आणि कांदा टाकून परतून घ्या. त्यामध्ये एकत्र केलेले दही-बेसन टाका, मीठ, कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित परतून घ्या.थोडेसे पाणी टाकून झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्या. त्यातील पाणी संपल्यानंतर गॅस बंद करा आणि गरम गरम पिठलं भाकरीबरोबर खा.