अस्सल खेकडेखाऊ मंडळींना खेकडे पकडण्यापासून त्याला लालकंच वाटपात घोळवण्यापर्यतचा सारा मामला चोख ठाऊक असतो. त्यातही फक्त काळ्याच खेकड्यांचे दर्दी हे समुद्री लालपांढऱ्या खेकड्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तर समुद्री खेकड्यांच्या मांसल गराच्या जिव्हाप्रेमात असणारे खवय्ये काळ्यात काय ठेवलंय म्हणत नाक मुरडतात. याच खेकड्याची कोल्हापुरी स्टाईल झणझणीत रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर मग रविवारी खेकड्याचा हा बेत नक्की करा….

झणझणीत खेकडा रस्सा साहित्य

 • ७ खेकडे
 • २ कांदे
 • १ वाटी सुके खोबरे
 • ४-५ लवंग काळीमिरी
 • ४-५ लसूण पाकळ्या
 • १ टीस्पून खसखस
 • १ टोमॅटो
 • १ इंच आल्याचा तुकडा
 • ३ चमचे तेल
 • मीठ चवीनुसार
 • २ चमचे धने पावडर
 • १/२ चमचा हळद

झणझणीत खेकडा रस्सा कृती

स्टेप १

खेकडे स्वच्छ धुवून घ्या

स्टेप २
आता वाटण्याची तयारी कांदा खोबरं छान खरपूस भाजून घ्या त्या सोबत खसखस, लवंग, दालचिनी, काळीमिरी, लसूण भाजुन, घ्यावे.

स्टेप ३
वाटण करून घ्यावे.

स्टेप ४
खेकड्याचे छोटे छोटे नांगे‌ मिक्सर मधे वाटुन घ्यावे.

स्टेप ५
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर वाटण टाकून चांगले परतून घ्या. तिखट धने पावडर हळद टाकून चांगलं परतून घ्या.

स्टेप ६
पाहिजे तेवढे पाणी घालून चांगली उकळी आणावी उकळी आल्यावर त्यात खेकडे टाकून चांगले शिजवून घ्या. चवीनुसार मीठ घालून उकळी आणावी. आपला खेकडा रस्सा तयार आहे.

हेही वाचा >> वऱ्हाडी सँडविच; असा ब्रेकफास्ट कधी केला नसेल, या स्पेशल सँडविचची रेसिपी नक्की ट्राय करा

कोणताही उरलेला खेकडा मसाला हवाबंद कंटेनरमध्ये २ दिवसांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

सर्व्ह करण्यापूर्वी खेकडा मसाला पुन्हा गरम करा.

पूर्ण जेवणासाठी खेकडा मसाला वाफवलेल्या भाताबरोबर किंवा रोटीबरोबर सर्व्ह करा.

ताजेपणा आणि चव वाढवण्यासाठी ताज्या कोथिंबीरीने सजवा.

आहारात खेकड्याचा समावेश करा

खेकडे खाल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण राहते. खेकडयात असलेला पोटॅशिअम घटक शरीरात इलेक्ट्रोलेट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. कारण पोटॅशिअम हा घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावतो.