Premium

व्यक्तिवेध: मधुकरराव चक्रदेव

डोंबिवलीतील सामाजिक क्षेत्रातील एक खळाळता प्रवाह म्हणजे मधुकरराव चक्रदेव. डोंबिवली शहराचे साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, अर्थविषयक वलय जपले जावे म्हणून जी समर्पित भावाची मंडळी कार्यरत होती, त्यांच्यात मधुकरराव नेहमीच अग्रभागी असत.

Vyaktivedh Social Areas in Dombivli Madhukarrao Chakrade
व्यक्तिवेध: मधुकरराव चक्रदेव

डोंबिवलीतील सामाजिक क्षेत्रातील एक खळाळता प्रवाह म्हणजे मधुकरराव चक्रदेव. डोंबिवली शहराचे साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, अर्थविषयक वलय जपले जावे म्हणून जी समर्पित भावाची मंडळी कार्यरत होती, त्यांच्यात मधुकरराव नेहमीच अग्रभागी असत. त्या काळी डोंबिवलीतील खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठाणे अथवा मुंबईला जावे लागत असे. या मुलांना स्थानिक स्तरावरच क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून डोंबिवलीतच जिमखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डोंबिवली जिमखान्याच्या उभारणीत मधुकररावांचे मोलाचे योगदान होते. आता शहर परिसरातील हजारो विद्यार्थी या जिमखान्याच्या माध्यमातून आपली कौशल्ये विकसित करून देशासह जगाच्या कानाकोपऱ्यांत डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्राची पताका झळकवताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिमखान्याजवळच असलेले मैदान राज्याच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत होते. हे प्रशस्त मैदान जिमखान्याला मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात मधुकररावांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. डोंबिवलीचे नागरीकरण होत असताना येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँँकेच्या स्थापनेस आणि या विकासास चक्रदेव यांनी हातभार लावला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vyaktivedh social areas in dombivli madhukarrao chakradev amy

First published on: 01-12-2023 at 02:12 IST
Next Story
चिंतनधारा: साधू, संत, सत्ता यांची युती