गूगल पिक्सेल सीरिजमध्ये आता एआयची जादू पाहायला मिळणार आहे. कंपनीने ग्राहकांसाठी गूगलच्या पिक्सेल ८ ए (Google Pixel 8a) नावाचा स्मार्टफोन आणला होता. गेल्या अनेक दिवसांपासून गॅझेटप्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, भारतात Google Pixel 8a उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor G3 चिपसेट, 120Hz OLED डिस्प्ले व 64MP कॅमेरा आहे. तर गूगलच्या पिक्सेल ८ ए या स्मार्टफोनबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊ.

AI फीचर्स –
पिक्सेल ८ एमध्ये ऑडिओ मॅजिक इरेजर आहे ; जे तुमच्या व्हिडीओमधील विविध आवाज ओळखते आणि बॅग्राऊंडमधील आवाज कमी करते. तसेच AI वॉलपेपर, व्हिडिओ बूस्ट, सर्कल टू सर्च, Google चे व्हॉईस रेकॉर्डर ॲप आदी अनेक फीचर्स या स्मार्टफोनमध्ये असणार आहेत. पिक्सेल ८ ए मध्ये गुगलची टेन्सर जी ३ चिप असण्याची शक्यता आहे, जे पिक्सेल ८ सीरिजमागील पॉवरहाऊस आहे. ही चिप डिव्हाइसवर एआय क्षमता वाढविण्याचे आश्वासन देते.

फ्लॅगशिप-ग्रेड OLED डिस्प्ले –

स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फ्लॅगशिप-ग्रेड ओएलईडी डिस्प्ले (२४०० x १०८०, ४३० ppi) आणि हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. नेटफ्लिक्सवरील स्ट्रीमिंग पासून ते फोटो, रील स्क्रोल करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोनची मोठा स्क्रीन युजर्सना चांगला अनुभव देईल.चष्मा न लावता मजकूर वाचणे किंवा पाहणे सोपे जाईल.

हेही वाचा…कारमधून प्रवास करताना तुम्हालाही मळमळते का? Apple ने शोधलाय भन्नाट उपाय; लक्षात घ्या नवीन फीचर कसे काम करणार?

पिक्सेल ८ ए (Pixel 8a) मध्ये ८ जीबी रॅम, १२८ स्टोरेज देण्यात येणार आहे. Tensor G3, Google चा इन-हाऊस मोबाईल प्रोसेसर, दैनंदिन वापरात आनंदाने वेगवान काम करू शकतो. विविध ॲप्स चालवतो, एकाच वेळी असंख्य Chrome टॅब, गूगल डॉक्सवर डॉक्युमेंट लिहिणे, एडिट करणे, कोणत्याची अडचणी शिवाय युट्युब व्हिडीओ पाहणे आदी गोष्टी सहज सोप्या होतील. फक्त पिक्सेल 8a वर AI फोटो एडिटिंग टूल वापरण्यात थोडा वेळ लागू शकतो. कारण हे एडिटिंग क्लाउडमध्ये होत असते. पण, ही प्रोसेसरची समस्या नाही. फोटोवर AI चा रिझल्ट १४ ते १८ सेकेंद प्रतीक्षा करावी लागते.

कॅमेरा –

पिक्सेल ८ ए मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. पिक्सेल ८ एच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास पिक्सेल ७ ए सारखाच त्याचा कॅमेरा आहे. १३ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड तर ६४ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. फोनचा Tensor G3 प्रोसेसर कॅमेरा प्रोसेसिंग क्षमता वाढवत असला तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारसा बदल त्यात करण्यात आलेला नाही आहे.

बॅटरी –

पिक्सेल ८ एची बॅटरी 4492mAh एक दिवसापेक्षा जास्त काळ टिकू शकते. पण, ही बाबा लक्षात घेणेही महत्वाचे आहे की, हे तुमच्या मोबाईल वापरण्यावर अवलंबवून असेल.

किंमत –

पिक्सेल ८ ए aloe ग्रीन कलरमध्ये उपलब्ध असेल व भारतात याची किंमत ५२,९९९ रुपये असणार आहे.