Monkey Viral Video: माकडापासून उत्क्रांत होत होत माणूस तयार झाला. त्यामुळे माकडांना अनेकदा माणसांचे पूर्वज समजले जाते. माकडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यात ते माणसांप्रमाणेच भांडण करताना दिसतात अथवा काहीतरी काम करताना दिसतात. मागे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका माकडानं चक्क हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले होते. दरम्यान, आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल.

प्राणीदेखील मनुष्यांप्रमाणेच हुशार असतात. त्यांनाही माणसांप्रमाणे भावना असतात, सोशल मीडियावर माकड आणि माकडांना खाऊ-पिऊ घालणारे त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात चक्क त्याच्या हातामध्ये यूट्यूबचे सिल्व्हर बटण पाहायला मिळत आहे.

burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका झाडाखाली बसलेल्या माकडाच्या हातामध्ये यूट्यूबचे सिल्व्हर बटण पाहायला मिळत आहे. खरे तर हे सिल्व्हर बटण एका महिलेचे आहे आणि ती महिला माकडांना भेटण्यासाठी जंगलात पोहोचली आहे. ही महिला माकडांबरोबरच्या अनेक व्हिडीओंमध्ये सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. त्या महिलेच्या यूट्यूब चॅनेलला सिल्व्हर बटण मिळाले आहे आणि ते बटण दाखवण्यासाठी ती माकडांना भेटायला गेली होती. यावेळी एका माकडासमोर हे सिल्व्हर बटण ठेवते; पण इतक्यात तो ते पटकन उचलून हातात घेतो आणि त्याच्याकडे पाहतो.

हेही वाचा: ‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवरू शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत २५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “तो म्हणतोय हे माझंपण आहे.” तर आणखी एका युजरने लिहिलेय, “दीदी, तुझ्याकडे तो त्याचा हिस्सा मागत आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “तो किती उत्साही आहे हे पाहण्यासाठी.”

Story img Loader