Premium

त्वरित अपडेट करा गुगल क्रोम! हॅकिंगपासून वाचण्यासाठी ‘गुगल’चा सल्ला

गुगलने सर्व क्रोम वापरकर्त्यांना त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे

Update Google Chrome immediately Googles advice to avoid hacking and risk of losing personal data from phones and laptop
(फोटो सौजन्य: लोकसत्ता.कॉम) त्वरित अपडेट करा गुगल क्रोम! हॅकिंगपासून वाचण्यासाठी ‘गुगल’चा सल्ला

आपल्यातील बहुतेक युजर काही विशिष्ट माहिती, एखाद्या ठिकाणची माहिती शोधणे आदी गोष्टींसाठी ‘गुगल क्रोम’ या ब्राउझरचा वापर करतात. जर तुम्हीसुद्धा क्रोम ब्राउझरचा उपयोग करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. गुगलने अलीकडेच मॅकओएस (macOS), विंडोज (Windows) आणि लिन्यूएक्स (Linux)वर त्याच्या क्रोम ब्राउझरसाठी एक क्रिटिकल सिक्युरिटी अपडेट जारी केले आहे. नव्या अपडेटमध्ये गुगलकडून झीरो डे वल्नरबिलिटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्या व्हर्जनचे क्रोम वापरणारे युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकतात, म्हणून गुगलने सर्व क्रोम वापरकर्त्यांना त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. CVE-2023-6345 या एक्सप्लॉईटबद्दल गुगलच्या थ्रेट ॲनालिसिस ग्रुप (TAG) मधील सुरक्षा संशोधकांनी गेल्या आठवड्यात शोधला होता, जो असुरक्षित क्रोम इन्स्टॉलेशन्सचे ॲक्सेस करण्यास हॅकर्सना मदत करू शकतो.

CVE-2023-6345 हे ओपन-सोर्स २डी (2D) ग्राफिक्स लायब्ररी क्रोम ग्राफिक्स इंजिनमध्ये एम्बेड केलेली आहे. सँडबॉक्स एस्केप हा एक गंभीर धोका आहे. कारण यामुळे अनियंत्रित कोडची अंमलबजावणी आणि डेटा चोरी होऊ शकते, ज्यामुळे क्रोम ब्राउझरच्या सुरक्षिततेशी आणि वापरकर्त्याच्या संवेदनशील माहितीशी तडजोड होऊ शकते. एक्सप्लॉईट CVE-2023-6345 मध्ये जोखीम आहे. यामुळे वापरकर्त्याच्या पर्सनल डेटावर प्रवेश केला जाऊ शकतो आणि ज्यामुळे डेटा हाताळणी आणि इतर सायबर धोकेसुद्धा उद्भवू शकतात. या सगळ्यावर उपाय म्हणून गुगल कंपनीने तात्काळ वापरकर्त्यांना त्यांचे गुगल क्रोम अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्यांचे गुगल क्रोम अपडेट आहे, त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा…मोबाईल भिजला तर तांदळाच्या डब्यात ठेवायचा की नाही ? जाणून घ्या…

गुगल क्रोम अपडेट करण्यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.

१. गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये प्रवेश करा.
२. About क्रोम या टॅबवर क्लिक करा.
३. आणि अपडेट गुगल क्रोम या पर्यायावर क्लिक करा.
४. जर तुम्हाला हा पर्याय दिसत नसेल तर तुमचे गुगल क्रोम लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेटेड आहे हे लक्षात घ्यावे.

गुगलने वापरकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांमध्ये हा अपडेट सर्वांसाठी लागू केला जाईल. टप्प्याटप्प्याने रोलआउटचा परिणाम होऊ शकतो. लगेच सर्व वापरकर्त्यांसाठी त्वरित उपलब्ध होणार नाही. असे असले तरी, CVE-2023-6345 द्वारे उद्भवलेल्या संभाव्य जोखीम लक्षात घेता, वापरकर्त्यांना त्यांच्या ब्राउझिंग अनुभवाच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी ते उपलब्ध होताच सतर्कता राखण्यासाठी आणि क्रोम अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Update google chrome immediately googles advice to avoid hacking and risk of losing personal data asp

First published on: 02-12-2023 at 18:17 IST
Next Story
ॲपलने नवीन स्मार्टवॉचसाठी बोल्ड कलर केला सादर! ‘हे’ आहेत खास फिचर…