बुद्धिबळ, सापशिडी, बोर्डवर कमीतकमी गोटय़ांची संख्या ठेवण्याचा खेळ, तसेच कागद-पेन घेऊन खेळायचा फुली-गोळ्याचा खेळ हे मनोरंजनात्मक त्याचबरोबर ते चातुर्यात भर टाकणारेही असतात. पेपरमध्ये येणारी शब्दकोडी सोडवणे हा तर कित्येकांच्या दिनक्रमाचा एक भाग असतो. आता हे आणि अशाच प्रकारचे मनोरंजक आणि बुद्धीला चालना देणारे खेळ अ‍ॅप्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. आज आपण इंग्रजी शब्दांचे भांडार वाढवणाऱ्या आणि ते तपासून बघणाऱ्या गेम्सच्या अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊया.
लुलो अ‍ॅप्स ‘एफझेड क्लासिक वर्ड्स सोलो (Lulo Apps ¨FZ Classic words solo)  हा गेम ‘स्क्रॅबल’ या खेळावर आधारित आहे. यात खेळाडू म्हणजेच अर्थात तुम्ही कॉम्प्युटरच्या विरुद्ध खेळता. त्यामुळे तुम्हाला ऑनलाइन प्रतिस्पर्धी मिळण्याची किंवा त्याच्या खेळण्याची वाट बघत बसावे लागत नाही.
या खेळात अगदी सोप्यापासून ते अवघड असे स्तर उपलब्ध आहेत. खेळाचे नियम ‘स्क्रॅबल’ प्रमाणेच आहेत. शब्द तयार करण्यासाठी तुम्हाला सात अक्षरे दिली जातात. त्यापासून ‘स्क्रॅबल’ बोर्डवर एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. प्रत्येक शब्द हा तुम्ही किंवा तुमच्या प्रतिस्पध्र्याने आधी तयार केलेल्या शब्दांनाच जोडून करायचा असतो. तुमच्या जवळ असलेल्या प्रत्येक अक्षरावर विशिष्ट मार्क दिलेले असतात. आणि बोर्डावर काही चौकटींवर डबल लेटर, डबल वर्ड, ट्रिपल लेटर, ट्रिपल वर्ड असे लिहिलेले दिसते. म्हणजेच तुम्ही तयार केलेला शब्द जर असे लिहिलेल्या चौकटीवर असेल तर त्याप्रमाणे गुण मिळतात. आणि तुमच्याजवळ असलेल्या सातही अक्षरांचा वापर करून जर तुम्ही एक शब्द बनवलात तर पन्नास गुण बोनस म्हणून दिले जातात.
तुमच्याजवळ असलेल्या शब्दांपासून जर तुम्हाला शब्द बनवता येत नसेल तर तुम्ही तुमचा डाव ‘पास’ करू शकता. किंवा तुमच्या जवळची सर्व किंवा तुम्हाला नको असलेली अक्षरे बदलून घेऊ शकता. बोर्डवर तयार झालेल्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर त्या शब्दावर केवळ बोट फिरवून तो निवडा. शब्दाचा अर्थ तसेच नाम, क्रियापद, विशेषण किंवा क्रिया विशेषण यापैकी काय आहे ही व्याकरणात्मक माहिती दर्शवली जाते.
‘स्क्रॅबल’ हा खेळ खेळण्यासाठी तुमच्याजवळ शब्दसंपत्ती भरपूर असावी लागते. त्यामुळे नुकतीच शब्दांशी ओळख होत असलेल्या वयोगटाला हा खेळ सहजपणे खेळता येणे कठीण असते. अशा वयोगटासाठी bindas चे word drop हा अतिशय उत्तम असा गेम आहे. या खेळात वरून खाली पडणाऱ्या अक्षरांतून जास्तीतजास्त शब्द तयार करायचे असतात. कमीतकमी तीन अक्षरी शब्द येथे बनवायचा असतो.

हा खेळ तीन प्रकारात खेळता येतो.
१)पॅनिक मोड २)पझल मोड ३)टाईमिंग मोड

malavya rajyog 2024
मे महिन्यात शुक्र ग्रहात बनणार ‘मालव्य राजयोग’; या राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

पॅनिक आणि पझल मोडमधे स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या निळ्या रंगाच्या रेषेला अक्षर लिहिलेल्या चेंडूचा स्पर्श झाला तर हा गेम संपतो.
पॅनिक मोडमध्ये हे चेंडू अखंड खाली पडत राहतात. त्यामुळे ते निळ्या रंगाच्या रेषेला लगेचच स्पर्श करू शकतात. त्यामुळे समोर आलेल्या अक्षरातून तुम्हाला किती जलद शब्द सुचतात आणि ते किती जलद टाइप करता याची कसोटी येथे लागते.
पझल मोडमधे तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक शब्दानंतर पाच नवी अक्षरे समाविष्ट होतात. आणि अक्षरे वाढत जाऊन ती निळ्या रेषेला स्पर्श करण्याच्या आत शब्द बनवण्याची जबाबदारी तुमची असते. टाइम मोडमधे तुम्हाला केवळ तीन मिनिटात जास्तीतजास्त शब्द बनवायचे असतात. वेळाशी स्पर्धा करणाऱ्यांना हा खेळ विशेष आवडेल.

 

मनाली रानडे
manaliranade84@gmail.com