कल्याण – डोंबिवलीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) दहा वर्षापूर्वी कारवाई केली होती. रामनगर पोलिसांनी या चोरी प्रकरणातील तपासात अनेक त्रृटी ठेवल्या आहेत. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध नसताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने या प्रकरणात गोवून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाणे येथील मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्ये यांनी मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेल्या इराणी टोळीतील दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपींतर्फे ॲड. पुनीत माहिमकर, ॲड. राजय गायकवाड, ॲड. जावेद शेख यांनी काम पाहिले. आरोपींच्या वकिलांनी पोलिसांनी प्राथमिक नोंदणी अहवालात दोन आरोपींचा उल्लेख करून उर्वरित आठ आरोपींचा उल्लेख नसताना त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे नसताना त्यांच्यावर मंगळसूत्र चोरल्याचा ठपका ठेवल्याचे कथानक रचले. या सर्व आरोपींना मोक्का कायद्याने कारवाई केली, अशी माहिती न्यायालयाला दिली. सरकार पक्षातर्फे त्याचा प्रतिवाद करण्यात आला.

हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

मोक्का न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मंंगळसूत्र चोरीचा आरोप ठेऊन त्यांना मोक्का लावलेल्या दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली. सुटका झालेले दहा आरोपी आंबिवली येथील इराणी वस्तीमधील रहिवासी आहेत. ते कुख्यात इराणी टोळीचे सदस्य आहेत. मुक्तता झालेल्यांमध्ये शेरबी युसुफ सय्यद (७७), फिजा रहिम शेख (४२), वासिम फिरोज इराणी (३७), शकील सय्यद ९४२), मेहंदी सय्यद (४०), साधू इराणी (३३), यावर सलीम हुसेन (३७), यावर काझम हुसेन (३७), तरबेज जाकर इराणी (४०), अख्तर इराणी (३७), नासिक हाफिज खान (४५) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर येथून फेब्रुवारी २०१५ मध्ये दीपा टिकेकर ही महिला संध्याकाळच्या वेळेत पायी चालल्या होत्या. त्यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या दोन जणांनी दीपा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दीपा यांनी तक्रार केली होती.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

दुचाकीचा वाहन क्रमांंक पोलीस तक्रारीत नोंद नसताना पोलिसांनी कोणत्या तपासाच्या आधारे या आरोपींना अटक केली. दहा आरोपींविरुद्ध कोणते सबळ पुरावे तुमच्याकडे आहेत. तपासात अनेक त्रृटी असताना तुम्ही आरोपींना मोक्का कायदा लावला कसा, असे प्रश्न करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाने दहा आरोपींची मोक्का आरोपीतून मुक्तता केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli mangalsutra theft case 10 accused in irani gang acquitted from macoca ssb
Show comments