मीरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. मीरा रोड येथील रॉयल महाविद्यालय येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान सुरु असलेल्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गीता जैन यांना आतापर्यंत २५ हजार २८ मते मिळाली असुन, त्या ५ हजार ३०२ मतांनी आघाडीवर आहेत. या स्पर्धेत भाजपाचे नरेंद्र मेहता यांना १६ हजार ३२ मते मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांना ७ हजार ३९८ मते मिळाली आहेत. सध्या मतमोजणीची सातवी फेरी सुरु आहे. येत्या काही तासात हे मतांचे आकडे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुपारी दीड वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणे अपेक्षित

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचं मत मशालीला नाही, मग कुणाला? उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले, “यावेळी…”
rajabhau waje bhaskar bhagre to file nomination from nashik and dindori constituency
राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे अर्ज सोमवारी; महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार ठरेना
chandrapur lok sabha marathi news, sudhir mungantiwar marathi news
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवण्याचे भाजप-काँग्रेससमोर आव्हान
Himachal Pradesh Lok Sabha Election 2024
हिमाचल, उत्तराखंडमध्ये यंदा काँग्रेस खाते उघडणार?

मतमोजणीसाठी एकंदर १४ टेबल लावण्यात आली आहेत. ४२६ मतदानकेंद्रांवर मतदान पार पडले असून ४२६ मतदानयंत्रांची मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी मतमोजणीच्या ३१ फेऱ्या असतील.

वाहतुकीत बदल

मीरा रोड येथील सृष्टी परिसरात असलेल्या रॉयल महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सर्व वाहनांना पेणकर पाडय़ाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी असलेल्या रॉयल महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुरुवारी परीक्षा आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना महाविद्यालयात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक शांताराम वळवी यांनी दिली.