कोळेवाडीतील गावकऱ्यांना रस्ता विचारून आम्ही हटकेश्वर चढायला सुरुवात केली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. डोंगरमाथा गाठायला साधारणपणे दोन तास लागतील असे अनुमान होते. मळलेल्या वाटेने चढायला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात आम्हाला जंगल लागलं. आता हटकेश्वरच्या नेढय़ाखालून आम्ही उजवीकडे चालत होतो, पण इतकी ‘क्रॉसकंट्री’ करून सुद्धा वाट सापडेना. रस्ता चुकला होता. शेवटी पुन्हा माघारी फिरून त्या छोटय़ाशा जंगलातून कारवीचे रान चढत थेट वाटेला लागलो. आता आम्ही हटकेश्वरच्या नेढय़ाच्या अगदी खाली होतो. तिकडून उजवीकडे जशी वाट वळत होती तसे चढत गेलो. छातीवर येणारी ही चढाई चांगलीच दम काढणारी निघाली.
अगदी उजवीकडे हटकेश्वरच्याच तेली सुळक्याने लक्ष वेधून घेतले. आमच्या सभोवती सह्य़ाद्रीच्या अभेद्य डोंगररांगेने जणूकाही फेरच धरला होता. बरोबर समोर निरोळी डोंगर फणा काढून बसला होता. त्याच्यामागे कुंजरगडाचं डोकं दिसत होतं, त्याच्या शेजारीच कारकाई डोंगराखाली अथांग पसरलेल्या पिंपळगाव-जोगे धरणाचे निळेशार पाणी. अजून पलीकडे हरिश्चंद्राचं तारामती टोक, रोहिदास पर्वत, अलीकडे कोंबडा डोंगर, कलाडगड, न्हाप्ताचे जुळे सुळके, दूरवर आजोबा दिसत होते. कात्राबाई, घनचक्कर, शिरपुंज्याचा भैरवगड आणि त्याच्यामागे दूरवर कळसुबाई अशा अनेक गिरीशिखरांनी लक्ष वेधून घेतले. खाली माळशेज घाट, त्याच्या डावीकडे शिखरोबाचा डोंगर, पुष्पावती खोऱ्यातला निमगिरी सिंदोळा, १९६२ ला ‘अल-इटालिया’च्या विमान अपघातामुळे प्रसिद्ध झालेला देवदांडय़ा पर्वत, जीवधन दाऱ्या घाट, ढाकोबा त्याच्या अलीकडे हडसरने हळूच डोकं वर काढलेलं. सारा माहोलच मंत्रमुग्ध करणारा होता. मित्राच्या म्हणण्यानुसार वातावरण स्वच्छ असेल तर ह्य़ा डोंगरावरून साधारण २० एक डोंगर आणि किल्ले दिसतात. आज त्याचीच प्रचिती येत होती. अध्र्या पाऊण तासाच्या चढाईनंतर आम्ही हटकेश्वरच्या पश्चिम बाजूला पोहोचलो. आता गवताळ घसाऱ्यावरून खडी चढण पार करून अध्र्या तासाने ज्या घळीत पोचलो तेथून पुन्हा एका गवताळ घसाऱ्यावरून दोन-तीन अवघड टप्पे ओलांडल्यावर कातळातल्या कोरीव पायऱ्या होत्या. गवत आणि घसाऱ्यामुळे चढताना धमाल येत होती. तीन अवघड कातळ टप्पे ओलांडल्यावर एकदाचे माचीवर आलो. पुढच्या पाच मिनिटांत हटकेश्वरच्या मंदिरात दाखल झालो. पत्र्याची शेड असलेल्या मंदिरात असंख्य नंदी आमची वाट बघत होते. येथे थोडेसे वाकूनच आत प्रवेश करायला लागतो अन्यथा आपल्याच कपाळाने घंटानाद व्हायचा. प्रवेश करताना उजवीकडे एक मोठा नंदी, पाच पायऱ्या उतरून खाली गेल्यावर शंकराची पिंड लागते. त्याच्या शेजारीच अजून काही नंदी आहेत. मागे पाण्याचं छोटंसं कुंड आहे. या टाक्यातील थंडगार अमृतमधुर पाणी पिले आणि अगदी प्रसन्नपणे त्या हटकेश्वराच्या शांत गाभाऱ्यात आम्ही स्थिरावलो. संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक पाहणे . http://www. bankapure.
com/ 2014/01/ Hatkeshwar.html

Navneet rana amaravati
“यावेळी मोदींना घरी…”, नवनीत राणांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ; म्हणाले, “तुम्हाला मत देऊन…”
satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”