गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये करोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी लस तसेच औषध शोधण्यासाठी जगभरातील अनेक संस्था संशोधन करत आहे. असं असतानाच दुसरीकडे करोनाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची मदत घेतली जात आहे. तर काहीजण अगदी गरम पाण्यापासून ते इतर अनेक प्रकारच्या घरगुती उपचारपद्धती वापरुन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाचत आता डेअरी डे या दक्षिण भारतातील प्रसिद्ध आइस्क्रीम ब्रॅण्डने चक्क च्यवनप्राश फ्लेव्हरचे आईस्क्रीम बाजारात आणलं आहे. या आईस्क्रीममुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल असं सांगण्यात येत आहे.

कर्नाटकमध्ये उत्पादन घेणाऱ्या या कंपनीने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक फ्लेवर आईस्क्रीम बाजारामध्ये आणल्या आहेत. यामध्ये च्यवनप्राशबरोबरच हळद फ्लेवर, आवळा, मध, मीरपूड अशा फ्लेवरचे आईस्क्रीम कंपनीने तयार केले आहेत.

मात्र अनेकांना च्यवनप्राश फ्लेवरच्या या आईस्क्रीमची संकल्पना फारशी आवडलेली दिसत नाही. लोकांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहा.

१)
विनाश जवळ आला आहे

२)
बापरे काय फ्लेवर आहे

३)
याची खऱचं कोण वाट बघत होतं?

४)
भन्नाट वाटतयं

५)
हा आईस्क्रीम फ्लेवर कसा असू शकतो?

६)
मी तर कधीच खाणार नाही

७)
पहिली प्रतिक्रिया

८)
कोण खाणार हे?

९)
अजिबात नाही आवडलं हे

१०)
फोटोतून काय ते समजून जा

जसं की या कमेंटवरुन दिसत आहे अनेकांनी या आईस्क्रीमच्या फ्लेवरला फारशी पसंती दर्शवलेली नाही. मात्र तुम्हाला हे आईस्क्रीम खायला आवडेल का याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.