भारताच्या ७२ व्या ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त जगातील सर्वात उंच इमारतीला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली. दुबईतील बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत तिरंग्यात न्हाऊन निघाली होती. या इमारतीच्या अधिकृत अकाऊंटवरून बुर्ज खलिफाचा फोटो ट्विट करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दरवर्षी दुबईमधल्या बुर्ज खलिफाला विद्युत रोषणाई करण्यात येते.

नायगरा धबधब्यालादेखील तिरंगी प्रकाशयोजना करण्यात आली होती. विशाल धबधब्याच्या प्रवाहावर पडणाऱ्या तिरंगी विद्युत रोषणाईची प्रकाश किरणं अधिक मोहक दिसत होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यूयॉर्कमधल्या एम्पायर स्टेट इमारतीलाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती.