वर्षभरापासून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी चक्क एका पॉर्न वेबसाइटमुळे सापडल्याची घटना समोर आली आहे. या मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काही पॉर्न वेबसाईट्सवर व्हायरल झाले होते. दरम्यान ते फोटो मुलीच्या कुटुंबीयांच्या नजरेस पडले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत, अपहरण करणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला अटक केली आहे.

न्यूयॉर्क पोस्ट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी वर्षभरापासून बेपत्ता होती. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना तिचे साठहून अधिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर सापडले. या व्हिडीमध्ये ही मुलगी एका तरुणाबरोबर दिसत होती. अधिक चौकशी केल्यावर या तरुणाचे नाव क्रिस्टोफर जॉन्सन असल्याची माहिती समोर आली. याच तरुणाने तिचे अपहरण केले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आणि सापळा रचून त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्यासोबत अपहृत मुलगीही होती.

एका दवाखान्यातून या आरोपीचा पत्ता पोलिसांना मिळाला. या दवाखान्यात त्याने पीडित मुलीला गर्भपात करण्यासाठी नेले होते. ही आश्चर्यचकित करणारी घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडली आहे.