11 December 2017

News Flash

Viral : हेअरकट करण्यासाठी पाहा त्याने काय केले…

कौशल्याला दाद द्यायला हवी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 2:17 PM

हेअरकट करणे आणि स्टायलिश राहणे हा सध्या अनेकांच्या आयुष्याचा भागच झाला आहे. मग याला वयाचेही बंधन नाही. छान दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाणे हे तर अगदी सामान्य झाले आहे. यामध्ये वेगवेगळे हेअरकट करणे हाही एक स्टाईलमधील महत्त्वाचा भाग आहे. आता ही स्टाईल करण्यासाठी किंवा नियमित हेअरकट करण्यासाठी हेअरस्टायलिस्ट काय करतील सांगता येत नाही. एका लहान मुलाचा हेअरकट करण्यासाठी एकाने आपल्या पार्लरमध्ये जमिनीवर झोपूनच हेअरकट केला. त्याचा असा हेअरकट करतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो कॅनडामधील असून त्यामध्ये हेअरस्टायलिस्टचे कौशल्य दिसून येत आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सिस नावाच्या स्टालिस्टने वायट नावाच्या ६ वर्षांच्या मुलाचा अशाप्रकारे हेअरकट केला आहे. आता असे का केले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर वायट हा मुलगा ऑटिजमग्रस्त असून त्याला हेअरकट करणे अजिबात आवडत नसल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. एकीकडे वायटसारख्या मुलांचा हेअरकट करण्यास इतर कोणीही हेअरस्टायलिस्ट तयार नसताना फ्रान्सिस मात्र त्याच्याशी त्याचा बेस्ट फ्रेंड असल्यासारखे त्याचे स्वागत करतो.

याबाबत फ्रान्सिस म्हणतो, मी वायटचा हेअरकट करत असताना तो कायमच इकडेतिकडे फिरत असतो. कधी तो आईच्या कुशीत जातो, कधी जमिनीवर बसतो तर कधी खुर्चीच्या बाजूला उभा राहतो. त्यामुळे त्याचे केस कापणे हे एक आव्हान असते. त्याच्यासाठी मी केस कापण्याचे वायरलेस यंत्र आणले आहे. सोशल मीडियावर हा फोटो दिड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्याला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First Published on October 12, 2017 2:17 pm

Web Title: viral picture barber lies down on floor to cut boys hair