प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नाती ही जन्मापासूनच जोडली जातात. काही नाती रक्त्ताची असतात तर काही प्रेमाची. नात्यांशिवाय व्यक्तीचं आयुष्याला मज्जा नाही. आई-बाबा, बहिण-भाऊ, काक-काकू, आत्या-मावशी, मामा, आजी आजोबा, मित्र-मैत्रिणी अशी काही हक्काची नाती आपल्याकडे असतात. प्रत्येक नात्यामध्ये आपल्या किती आठवणी असतात. कितीही दूर गेले तरी अशी नाती मनात कायम जीवंत असतात. अशाच एका सुंदर नात्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो दोन वृद्ध भावंडाचा आहे जे अनेक वर्षांनी पुन्हा भेटत आहे. त्यांच्या सुरकुसतलेल्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्स या सोशल मीडियावर भाविक सगलानी यांनी ‘झकर डॉक्टर’ (Zucker Doctor)नावाच्या खात्यावरू आपल्या आजोबांचे काही फोटो शेअर केले आहे. ९८ वर्षाचे त्याचे आजोबा त्यांच्या लहान भावाला भेटण्यासाठी किती उत्साही आहेत फोटोत दिसते आहे. भावंडाच्या भेटीचा हा सुंदर क्षण फोटोमध्ये कैद झाला आहे. नेटकऱ्यांना हे पोस्ट प्रचंड आवडली आहे.

फोटोमध्ये दिसते की दोन्ही भावंड आता शरीराने थकले आहे, चेहऱ्यावर सुरुकुत्या दिसत आहेत. केस पांढरे झाले आहे. दातांमधील पोकळी दिसते आहे. पण मनातील प्रेम अजूनही कायम आहे. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील त्यांचा आनंद पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू घेऊन येईल.

हेही वाचा – दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये भाविकने आपल्या आजोबांबद्दल सांगितले आहे. “माझे नाना(आजोबा) आणि त्यांची भावंड अशी ११ जणांची टीम होती. त्यापैकी फक्त दोनच अजूनही जिवंत आहेत. माझे नाना ९८ वर्षांचे आहेत आणि त्यांचा एक धाकटा भाऊ त्यांच्या वयाच्या८० वर्षीपासून अमेरिकेत राहत आहे. नुकतेच ते भारतता नानांना भेटायला आले होते.” असे भाविकने लिहिले.

हेही वाचा – रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?

भाविकने पुढे सांगितले की, “त्यांचा जन्म ११ भावडांच्या कुटुंबात झाला होता ते खूप आनंदी वृत्तीचे आणि दृढनिश्चयी आहेत. गुजरातमधील प्रसिद्ध शहर अहमदाबादमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २० व्या वर्षी कामासाठी ते स्वातंत्र्यापूर्व काळातील बॉम्बे म्हणजेच आजच्या मुंबईत आले आणि त्यानतंर त्यांची भावंडेही त्यांच्यापाठोपाठ तिथे आले. जे कोणी मुंबईत आले ते शिक्षण पूर्ण होई पर्यंत किंवा स्वत:चे घर घेईपर्यंत नाना-नानीच्या घरीच राहत असत.”

गेल्या वर्षी आपल्या आजीच्या निधनाचा उल्लेख करताना, भाविक म्हणाला की,” तिने कुटुंबाचे पालनपोषण आणि काळजी घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्ही गेल्यावर्षी नानीला गमावले आणि तिने माझ्या नानांच्या भावंडासाठी खूप काही केले आहे जेव्हा मुंबईत शिक्षण घेत होते किंवा काम करत होते. पण आता, माझ्या नानांच्या कामाच्या डेस्कजवळ एक फोटो ठेवला आहे आणि आमच्याकडे खूप गोड आठवणी आहेत.”

हेही वाचा – फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

शेवटी त्याने सांगितले, “प्रत्येक कुटुंबाची एक गोष्ट असते जी जपून आणि सांभाळून ठेवतात. प्रेमाची गोष्ट, कुटुंबाची गोष्ट, मदतीची गोष्ट आणि एकत्र राहण्याची गोष्ट”

भाविकचे नाना आणि त्यांचा धाकटा भाऊ या भावांडाची अनेक वर्षांनतर झालेली भेट त्यांच्यातील नाते किती दृढ आहे दाखवते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 98 year old mans reunion with younger brother will make you cry happy tears snk