Viral Video : दर दिवशी सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कापड विक्रेता फॉरेनरला कपडे कसे विकायचे, हे शिकवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

भारतात दरदिवशी हजारो विदेशी पर्यटक भारत भ्रमंती करायला येतात. अनेक विदेशी पर्यटक ऐतिहासिक वास्तू, लोकक मार्केटमध्ये फिरायला जातात. असाच एक फॉरेनर मार्केटमध्ये फिरत होता. तेव्हा त्याला एक कापड विक्रेता कपडे विकताना दिसला. त्यानंतर जेव्हा तो त्या कापड विक्रेत्याजवळ गेला तेव्हा कापड विक्रेत्याने त्याला जवळ बोलावले आणि त्यालाही कपडे कसे विकायचे, हे शिकवले. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की विक्रेता त्याला ‘एकसो पचास मे दो’ ही किंमत लोकांना कशी सांगायची, हे शिकवतोय. पुढे फॉरेनरसुद्धा विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे, कपडे विकताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कोरियन तरुणी भारतीय नृत्यावर थिरकली! तिचे शास्त्रीय नृत्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : राहुल गांधींच्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ‘या’ जागांवरून चीनच्या भीतीने घेतला काढता पाय? ‘त्या’ पोस्टचा अर्थ काय?

VishalMalvi_ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मिया भाई रॉक, इंग्रज शॉक”तुम्ही आजवर अनेक मजेशीर व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओवर लाखो लाइक्स आल्या असून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजने लिहिलेय, “वाह, मजा आली” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ अहमदाबादचा आहे ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.