दुचाकी चालवताना नेहमी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून अपघात होऊ नये. हा सल्ला फक्त दुचाकी चालवणाऱ्यांनाच नव्हे तर दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दिला जातो विशेषत: महिलांना. कारण महिलांची साडीचा पदर किंवा ओढणी दुचाकीच्या चाकात अडकून मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे महिलांना नेहमी दुचाकीवर बसताना साडीचा पदर किंवा ओढणी सावरून मग बसावे असे सांगितले जाते. तरीही अनेकदा घाई गडबडीत किंवा दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात घडतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिलेच्या साडीचा पदर दुचाकीमध्ये अडकला. पण त्यानंतर पुढे जे काही घडले ते मात्र अनपेक्षित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबईत ३२३ चौरस फुटांत टू बीएचके फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा व्हायरल VIDEO

इंस्टाग्रामवर gyanmarg06 नावाच्या अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक जोडपे दुचाकीवरून जात आहे तेवढ्यात महिलेच्या साडीचा पदर चाकामध्ये अडकतो. सुदैवाने महिलेच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ती लगेच गाडी थांबवण्यास सांगते. महिलाचा पती दुचाकीच्या चाकात अडकलेला पदर काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो पटकन निघत नाही. महिला भररस्त्यात तिचा पदर पकडून उभी असते. ती अत्यंत घाबरलेली असते तेवढ्या तिथे झाडून काढणारा सफाई कर्मचारी महिलेच्या मदतीला पुढे येतो. सुरुवातीला तो चाकातून साडी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर लगेच स्वत:चा शर्ट काढून महिलेला देतो. महिलेच्या खांद्यावर शर्ट टाकून तो तिच्या नवऱ्याला मदत करतो. थोड्यावेळाने साडीचा पदर चाकातून निघतो. त्यानंतर महिला त्या सफाई कर्मचाऱ्याला शर्ट परत करते आणि जोडपे त्यांच्या मदतीसाठी त्या काकांचे आभार व्यक्त करतात.

हेही वाचा – “GPSच्या भरवशावर राहणे पडले महागात!” नदीवरील लाकडी झुलत्या पुलावर अडकली महिलेची कार

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक सफाई कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे कौतूक करत आहे. संकटात सापडलेल्या लोकांची मदत कशी करावी याचे हेच हा व्हिडीओ सांगत आहे. व्हिडीओवर लोकांनी कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “काका किती चांगले आहेत”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman saree stuck in the wheel of a two wheeler a cleaning worker help them uncles humanity won everyones heart viral video snk
First published on: 03-02-2024 at 00:34 IST