BJP Workers Attacked By People Video: आज १९ एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली आहे. या निमित्ताने अनेक पोस्ट व व्हिडीओज सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. यातील काही व्हिडीओज हे चुकीच्या हेतूने व माहितीसहित शेअर केले जात असल्याचे लाइटहाऊस जर्नालिज्मला लक्षात आले. त्यातीलच एका व्हिडीओ संदर्भातील हे निरीक्षण नक्की वाचा. संबंधित व्हिडीओमध्ये भाजपा चे स्टिकर लावलेल्या वाहनांवर काहीजण हल्ला करताना दिसत आहेत. लोक भाजपावर एवढे मेहेरबान आहेत की ४ जूनला सकाळी ११ वाजल्यापासूनच देशात भाजपचा उदोउदो सुरु होईल अशा उपहासात्मक कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. यात नेमकं किती प्रमाणात तथ्य आहे हे आता आपण जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Jeetu Burdak ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च करून अनेक स्क्रीनग्रॅब मिळवून आमचा तपास सुरू केला. एका कीफ्रेमवर आम्हाला ‘आग्रा’ हा शब्द दिसला. आणि वाहनाच्या नंबर प्लेटवर ‘UP75’ असा उल्लेख आहे. यूपी 75 हा इटावा येथील आरटीओ क्रमांक आहे. त्यामुळे व्हिडीओ आग्रा किंवा इटावाचा असू शकतो हे नक्की झाले होते.

आम्ही प्राप्त केलेल्या सर्व कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपास केला असता आम्हाला X वर एक असाच व्हिडिओ सापडला जो व्हायरल व्हिडीओ प्रमाणे दिसत होता.

व्हिडीओमध्ये माजी कॅबिनेट मंत्री राजा महेंद्र अरिंदमन सिंग आणि माजी ब्लॉक प्रमुख सुग्रीव सिंग यांच्या समर्थकांमध्ये आग्रा येथे बाइक रॅलीदरम्यान हाणामारी झाल्याचे कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा व्हिडीओ २०२१ चा आहे. त्यानंतर आम्ही कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला घटनेबद्दल अनेक बातम्या सापडल्या.

हे ही वाचा<< “नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच

https://timesofindia.indiatimes.com/city/agra/bjp-leader-345-supporters-booked-for-rioting-attempt-to-murder-in-agra/articleshow/88172399.cms
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/agra/raja-mahendra-aridaman-singh-and-jagveer-singh-chauhan-supporters-clash-video-in-agra/videoshow/88143541.cms
https://www.aajtak.in/elections/up-assembly-elections/story/fight-between-two-bjp-leaders-supporters-to-get-election-tickets-in-agra-bah-assembly-constituency-ntc-1369732-2021-12-07

UP Tak च्या YouTube चॅनेलवर आम्हाला याबद्दलचा व्हिडिओ अहवाल देखील सापडला.

निष्कर्ष: आग्रा येथील भाजप कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा जुना व्हिडिओ अलीकडचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे, ज्यात लोकांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.