सध्या तरुणांमध्ये इन्स्टाग्राम रिल्स बनवण्याची क्रेझ इतकी वरचढ झाली आहे की, ते स्वत:च्या जीवाशी खेळण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. कधी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन धोकादायक स्टंट करताना दिसतात, तर कधी बाइकवर बसून धोकादायक स्टंट करताना रिल्स बनवतात. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर अशा विचित्र गोष्टी करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर रिल्ससाठी अशाचप्रकारे जीवघेणे स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक् व्हाल. यावरून तुम्हाला अंदाज येईल की, रीलसाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात.

मित्राला प्लास्टिक रॅपरमध्ये गुंडाळून चालत्या कारबाहेर लटकावले

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही की, हे तरुण रील बनवण्यासाठी हे सर्व करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मित्र आपल्या एका मित्राला प्लास्टिकच्या टेपच्या साहाय्याने रॅपर करून त्याला चक्क चालत्या गाडीच्या डोअरवर अडकवल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांच्यातील एक तरुण भरधाव वेगाने गाडी चालवतोय, तर त्याच्या मागे बसलेला मित्र डोअरवर लटकत असलेल्या मित्राची मज्जा घेत आहे. तिघेही कशाचीही पर्वा न करता या जीवघेण्या प्रकाराचा आनंद घेत आहेत. चुकून ही प्लास्टिक टेप वाहनावरून निघाली असती तर त्या तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण, रील बनवण्यापलीकडे त्यांना दुसरे काही दिसत नव्हते.

या जीवघेण्या प्रकाराचा व्हिडीओ @fewsecl8r नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, खतरों के खिलाडी, पण हे चुकीचे आहे. आणखी एका युजरने लिहिले, तो तरुण वेडा आहे, अजून काय बोलणार?, अशाप्रकारे तरुणाच्या या जीवघेण्या कृतीवर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी संबंधीत तरुणांवर कारवाईची मागणी केली आहे.