गुरुवारी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाड्याला भेट दिली. यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी फुले वाड्यात १० हजार किलोची मिसळ तयार केली. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मेजवानीचा आनंद लुटला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्यावतीने फुले वाड्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान अभिवादन करण्यास येणार्‍या नागरिकांना ही मिसळ वाटण्यात येणार आहे.”भव्य एकता मिसळ” कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. शेफ विष्णू मनोहर यांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पुर्वी त्यांनी अनेकदा मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ बनवले आहे. अजित पवार यांनी शेफ विष्णु मनोहर यांच्या कडून एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ कशी बनवली याची माहिती घेतली.

हेही वाचा – खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध

अशी केली बनवली १० हजार किलोंची मिसळ

मोठ्या प्रमाणात प्रमाणात मिसळ तयार करण्यासाठी, १५ फूट बाय १५ फूट मोठ्या कढईचा वापर करण्यात आला, जो ६.५ फूट उंच आणि २५,०० किलो वजनाचा होता. स्टील, तांबे वापरून मोठ्या झाकणासह कढई बनवण्यात आली आहे. १० हजार किलोची मिसळ तयार करण्यासाठी साधारण मटकी २००० किलो, कांदा १६०० किलो, आले ४०० किलो, लसूण ४०० किलो, तेल १४०० किलो, मिसळ मसाला २८० किलो, तिखट ८० किलो आणि मीठ किलो, मीठ ०२ किलो, तसेच किलो एवढ्या प्रमाणात साहित्य वापरण्यात आले. तसेच नारळाचा चुरा, ५००० किलो फरसाण, १००० किलो दही, २०,०००लिटर पाणी, २५० किलो कोथिंबीर आणि २००० लिंबू वापरण्यात आले.

हेही वाचा – ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video

याशिवाय मिसळ खाण्यासाठी एक लाख डिस्पोजेबल डिश, पिण्याच्या पाण्याचे एक लाख डिस्पोजेबल ग्लास आणि ब्रेडच्या तीन लाख स्लाइसचा वापर करण्यात आला. पुण्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले होते.