Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्या ढोल ताशाच्या तालावर अप्रतिम डान्स करताना दिसतात. या दोन चिमुकल्या गोंधळ करत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

गोंधळ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक महत्त्वाचा नृत्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये गोंधळाला विशेष महत्त्व आहे. या व्हिडीओत तुम्हाला दोन चिमुकल्या गोंधळ नृत्य सादर करताना दिसतील. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत अनेक महिला त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. हा हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ असल्याचे दिसतेय.

हेही वाचा : अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन चिमुकल्या अप्रतिम डान्स करताना दिसेल. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ढोल ताशाच्या गजरात अतिशय ऊर्जेने डान्स करताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून त्यांच्या भोवती जमलेल्या महिला सुद्धा त्यांना डान्स करण्यास प्रोत्साहन देताना दिसतात. चिमुकल्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्यांना पाहून तुम्हालाही डान्स करावासा वाटेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : RITES Limited recruitment 2024 : RITES लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या अधिक माहिती…

chetan_solomaker05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ताईंचा अप्रतिम डान्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी पोरींनो गाजवलात” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम ऊर्जा” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर व्हिडीओ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून या चिमुकल्या मुलींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.