Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रो सध्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. खरं तर मेट्रोची निर्मिती लोकांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी करण्यात आली आहे. पण गेल्या काही काळात या मेट्रोमध्ये प्रवासासोबत भलतंच काहीतरी घडताना दिसतंय. हे सर्व कमी होतं म्हणून की काय आता थेट मेट्रोचा वापर भांडण, रोमान्स करण्यासाठी केला जातो. इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक कपल चक्क प्रवाशांनी भरलेल्या मेट्रोमध्ये मोठमोठ्यानं भांडण करताना दिसत आहे. काहीवेळानं तर ते एकमेकांवर हातही उचलतात. मात्र या भांडणाची सुरुवात कशी झाली हे सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत.

जरा तरी आदर कर, लोक पहात आहेत

दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होण्याचा सिलसिला थांबत नाही आहे. मेट्रोमधील अश्लील कृत्यांचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये मेट्रोमध्ये उभ्या असलेल्या एका जोडप्यामध्ये काही गोष्टीवरून वाद झाल. यानंतर तरुणी तिच्या हातातील बॅगने तरुणाला मारते. यावर तरुण संतापतो आणि जरा आजूबाजूचं भान ठेव लोकं आपल्याकडे पाहत आहेत असं सांगतो. मात्र तरुणी खूप संतापलेली दिसत आहे. ती त्याला इथून निघून जा म्हणत पुन्हा त्याच्या कानाखाली मारते. यानंतर मात्र तरुणाला राग अनावर होतो आणि तोही तीच्या कानाखाली मारतो. यावर तरुणी “बघ मी आईला सांगेन, तुझ्यासारखा मुलगा कुणाला मिळू नये, माझ्या आयुष्यात येऊ नकोस, इथून निघून जा” म्हण तरुणाला मारहाण करते.

पाहा व्हिडीओ

मेट्रोमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी प्रतिक्रिया देत असून एका युजरनं म्हंटलंय की, “आता कुणी स्त्री-पुरुष समानतेवर बोलणार नाही”

हेही वाचा >> बायकोनं नवऱ्याला तीन दिवस साखळीनं बांधून केली मारहाण; पोलिसांनी धाड टाकताच समोर…तेलंगणातील धक्कादायक VIDEO

नुकताच मेट्रोमध्ये बिकिनी घातलेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतील आणखी एक लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून बसलेले दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चाळे केल्याने इतर प्रवाशांना मेट्रोमधून प्रवास करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. तेव्हापासून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच डीएमआरसीकडे मेट्रोमधील अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवण्याची मागणी केली जात होती. आता दिल्ली डीएमआरसीने मेट्रोच्या डब्यांवर गस्त घालण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांचा समावेश असेल. गस्त घालणारे सैनिक साध्या पोशाखातही असू शकतात. लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वतः मेट्रोने प्रवास करणार आहेत.