Viral video: सोशल मीडियाचं जग इतकं विस्तारलं आहे की, जगाच्या कान्याकोपऱ्यातील गोष्टी आपल्याला मोबाईलवर क्षणात कळतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचाही नेम नसतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. भारतीय संस्कृती, सामर्थ्यांविषयी जगाला खूप आकर्षण आहे. ते म्हणजे आपण जरी भारतातून बाहेर आलो, तरी भारतीय संस्कृती काही आपल्यातून बाहेर जात नाही. अशाच एका भारतीय महिलेनं थेट दुबईत मराठमोळ्या गाण्यावर डान्स केला आहे. सातासमुद्रापार मराठमोळी संस्कृती जपणाऱ्या महिलेचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत देश संस्कृतीने नटलेला आहे. देशात विविध भागात वेगवेगळ्या संस्कृती आहेत. त्यानुसार तेथील पोषाख, खाण्याचे पदार्थ असतात. हीच संस्कृती अनेकदा सातासमुद्रापार पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये एक भारतीय मुलगी वधूच्या पोशाखात उभी असलेली दिसत आहे. हा व्हिडिओ इंग्लंडची राजधानी लंडनमधील आहे. या भारतीय मुलीला वधूच्या पोशाखात पाहून लंडनमधील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.मुलीला वधूच्या पोशाखात पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर मुलगी लंडनच्या मेट्रोने जाते. तिथेही लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. काही लोक त्या मुलीचे फोटो काढू लागतात. तर काही व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात.

लंडन मेट्रोमध्ये उभ्या असलेल्या एका महिलेला भारतीय वधूचा पोशाख आवडतो. ती त्याचं कौतुक करतानाही दिसत आहे. साधारणपणे असे कपडे लंडनमध्ये घातले जात नाहीत. त्यामुळे एका भारतीय मुलीला या कपड्यांमध्ये पाहून लंडनमधील सर्व लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? VIDEO बघून कळेल नेमकं प्रकरण काय…

लोक भरपूर कमेंट करत आहेत

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @shr9ddha नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर लोकांकडून अनेक कमेंट येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.’ दुसऱ्या युजरने , ‘जर तुम्ही असा लेहेंगा घालून भारतीय मेट्रोमध्ये गेलात तर तिथेही लोक अशाच प्रतिक्रिया देतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl dressed in indian bridal attire london people stared at her see viral video srk
First published on: 06-02-2024 at 14:09 IST