Premium

“पाकिस्तानात मला अत्याचार, जबरदस्ती..”, अंजुने सीमा हैदरला कॉलवर सांगितला भयंकर अनुभव; Video ची खरी बाजू काय?

Anju Seema Haider Call Recording: अंजुचं बोलणं ऐकून सीमा सांगते की, “माझ्याबरोबर पण तिथे असंच होत होतं, म्हणूनच मी भारतात निघून आले, आता तू परत कधी जाणार आहेस? त्यावर अंजु उत्तर देते की, “मी आता.. ”

I was Tortured By Pakistan Police Govt Says Anju To Seema Haider In Viral Call Recording Fact Check Of Most Controversial Case
अंजु- सीमा हैदरला कॉलचं सत्य काय? (फोटो: X/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Anju and Seema Haider video call: पाकिस्तानच्या ‘फेसबुक फ्रेंड’ साठी भारतातू घर- संसार सोडून निघून गेलेल्या अंजुच्या कहाण्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. २९ नोव्हेंबरला पाकिस्तानातून अंजु पुन्हा भारतात आली आणि तेव्हापासून मीडियाशी बोलताना तिने पाकिस्तानात आलेल्या अनुभवाविषयी सुद्धा अनेक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी लोक कशाप्रकारे अंजुला सतत मोदींविषयी कौतुक सांगायचे, प्रश्न विचारायचे यावर तिने अलीकडेच एका मुलाखतीत माहिती दिली. तर आता दुसरीकडे अंजु आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक व्हिडीओ कॉल असून यामध्ये अंजु आणि सीमा पाकिस्तानविषयी गप्पा मारताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ कॉल मध्ये सीमा अंजुला विचारते की तू पाकिस्तानातून परत का आलीस? तर त्यावर उत्तर देत अंजु म्हणते, पाकिस्तानात मला पोलीस त्रास द्यायचे, तिथल्या सरकारने मला भारतात परत जाण्यासाठी भाग पाडलं, तिथे माझ्याबरोबर जबरदस्ती करत होते.” अंजुचं बोलणं ऐकून सीमा सांगते की, “माझ्याबरोबर पण तिथे असंच होत होतं, म्हणूनच मी भारतात निघून आले, आता तू परत कधी जाणार आहेस? त्यावर अंजु उत्तर देते की, “मी आता कधीच जाणार नाहीये, माझ्यावर तिथे अत्याचार होत होता.”

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओचे फॅक्ट चेक केले असता असे लक्षात येते की हा व्हिडीओ डीप फेक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेला आहे. जेव्हा तुम्ही व्हिडीओ बारकाईने पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अंजु आणि सीमा यांच्या शब्दांचा आणि ओठांच्या हालचालींना ताळमेळ बसत नाहीये. शब्द व हालचाल मागे पुढे होत आहे. इतकंच नव्हे तर दोघींचे आवाज सुद्धा अगदी वेगळेच येत आहेत. सीमा हैदरच्या व अंजुच्या मुलाखती ऐकल्यास हा आवाजाचा घोटाळा आमच्या पटकन लक्षात आला.

हे ही वाचा<< “पाकिस्तानात मोदींचं प्रचंड वेड..”, भारतात परतलेल्या अंजुचा अनुभव, म्हणाली, “ते लोक मला नेहमी मोदींचे..”

दुसरीकडे पाकिस्तानातून परतलेल्या अंजुने आपण भारतात आपल्या मुलांना भेटायला आलो आहोत असे सांगितले आहे. तसेच अंजु आणि नसरुल्ला एकत्र राहणार का? अंजुच्या मुलांचा नसरुल्ला स्वीकार करणार का हे सर्व काही नंतर ठरवलं जाईल असं तिने मुलाखतीत सांगितलं आहे. पण कोणत्याच अहवालात अंजुने पाकिस्तानविषयी तक्रार केल्याचे आढळत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I was tortured by pakistan police govt says anju to seema haider in viral call recording fact check of most controversial case svs

First published on: 08-12-2023 at 19:21 IST
Next Story
परदेशी निघालेल्या आईचा निरोप घेताना भावूक झाली जुळी लेकरं; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात येतील अश्रू