मद्यपान करून गाडी चालवणं हा गुन्हा आहे. त्यामुळे अनेक देशात ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात पकडले गेल्यास दंड आणि तुरूंगवासही होऊ शकतो. या प्रकरणात अनेकदा काही जण पकडले जाऊ या भीतीनं पोलिसांपासून पळ काढतात पण तुम्हाला माहितीये फ्लोरिडामधल्या एका इसमानं पळून न जात आपण मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती फोन करून पोलिसांना दिली, तेव्हा स्वत:चा गुन्हा कबुल करणाऱ्या या चालकाचा प्रमाणिकपणा पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं.

वाचा : आई- वडिलांचा निर्दयीपणा, १३ मुलांना घरात डांबून ठेवणारे पालक अटकेत

वाचा : हा मासा खाल्ल्यानं जीवही जाऊ शकतो, तरीही माशाला मोठी मागणी

मायकल लेस्टर असं या इसमाचं नाव असून ३१ डिसेंबरच्या रात्री त्यानं मद्यपान केलं. अतिमद्यपानामुळे त्याला स्वत:वर ताबा मिळवणं अवघड जात होतं. अशातच तो गाडी चालवत होता, आपण कोणत्या दिशनं गाडी चालवत आहोत, कुठे जात आहोत हेच त्याला कळत नव्हतं शेवटी त्यानं फ्लोरिडा पोलिसांना फोन करून आपण अतिमद्यपान केलं असल्याची माहिती दिली. खरं तर अशाप्रकारे ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी स्वत:ची तक्रार करणारा चालक पोलिसांनी यापूर्वी कधी पाहिला नव्हता, त्यामुळे पोलिसांनाही त्याचं राहून राहून आश्चर्य वाटलं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नंतर त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. अतिमद्यपान केल्यानं मायकल रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं गाडी चालवत होता. नियम मोडला म्हणून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

वाचा : …आणि आठवीतल्या मुलाला येतात २० कोटीपर्यंतचे पाढे