Viral video: सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर वंशाचे दिवे हवेतच कशाला”

आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो. मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वत:हा कमवून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी आणि आजोबा वयाच्या शेवटच्या काळातही कष्ट करत आहेत. हे आजी-आजोबा रस्त्याच्या कडेला ऊसाचं गुराळं चालवत आहेत. या आजोबांना नीट चालताही येत नाहीये तरी ते ऊसाचा रस काढत आहेत. तर आजी हा ऊसाचा रस येणाऱ्या ग्राहकांना देत आहेत.

आई-वडील आपल्या मुलांना मोठं करण्याासाठी कष्ट करतात, रात्रीचा दिवस करतात. काही मुलं आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करतात तर काहीजण आई-वडिलांच्या शेवटच्या काळात साथ सोडतात. अशावेळी वंशाच्या दिव्याचं करायचं काय असा प्रश्न पडतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भर उन्हात गाडीला लागली आग; लोक विझवायला गेले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, VIDEO पाहून थरकाप उडेल

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. अनेकजण यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण आजोबांचं कौतुक करत आहेत तर काही जणांनी या वयात कष्ट करावं लागत असल्यानं त्यांच्या मुलांना जबाबदार ठरवलं आहे.