शासकीय अधिकारी म्हटलं की त्यांच्या मागेपुढे करण्याबरोबरच कागद टेबलावरून हलविण्यासाठी अनेक प्रकार घडताना आपण पाहिले आहे. तर कधी राजकीय पदाचा धाक दाखवुन अवैध्य कामे पास करुन घेतली जातात. सरकारी काम सहा महिने थांब अशी परिस्थीती महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळते. शहर असो वा खेडेगाव या ठिकाणी सरकारी अधिकारी आपल्या कामाचा मोबदला पगारापेक्षा टेबलाखालून अधिक मिळवतात. बरेच सरकारी अधिकारी मलाई खातात. सरकारी अधिकारी आणि दलाल यांच्यात अधिक गट्टी असते. याचा फयदा दलालासही होतो. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी गोरगरीबांकडून गरजेपेक्षा अधिक पैसे घेतात. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र यावर आता एका गटविकास अधिकाऱ्याने सरकारी काम आणि प्रामाणिकपणा या दोन्ही बाबी सोबत घेऊन भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना शिकवण दिली आहे. आपल्या दालनासमोर असा फलक लावला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हे फलक सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्व स्तरातून या अधिकाऱ्याचं कौतुक होत आहे. तुम्हीही पाहा हे फलक…

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेरच हे फलक लावण्यात आलं आहे. श्री भुषण जोशी, गटविकास अधिकारी (गट-अ) अशी पाटी लावली आहे तर या पाटीच्या बरोबर खालीच एक फलक आहे. हाच फलक येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. यावर “मी माझ्या पगारावर समाधानी आहे, लोकसेवक – श्री. भुषण जोशी” असं लिहण्यात आलं आहे. कोणताही चुकीचा प्रकार कोणीही आपल्या नावाखाली करू नये यासाठी हा फलक लावला आहे. “मी माझ्या पगारावर समाधानी आहे.” याचा अर्थ मला कुणीही कोणत्याही प्रकारची लाच किंवा अमिष दाखवू नये असं यातून सांगायचा प्रयत्न केला आहे.

पाहा फलक

हेही वाचा >> VIDEO: “तुझ्यासारखा मुलगा कुणाला मिळू नये, माझ्या आयुष्यातून निघून जा” तरुणीनं बॉयफ्रेंडला चालू मेट्रोत कानफटवलं

कार्यालयात माझ्याप्रती कोणतेही गैर काम होऊ नये. यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून काम करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा आहे. अधिक माया जमवायची इच्छा नाही. जे योग्य काम आहे, ते मार्गी लावणारच अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. हा फोटो इन्स्टाग्रामवर spardhapariksha_2023 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी असाच फलक साताऱ्यातील गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर लावला होता.  बुद्धे यांचे पद आणि त्या अंतर्गत येणारी कामे ही थेट जनतेच्या संपर्काची असल्याने येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्यांसाठी हा फलक लावला होता.