Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक जण रिल किंवा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती भर रस्त्यावर रिल बनवत होती पण ही रिल बनवणे तिला चांगलेच महागात पडले. रिल बनवणाऱ्या महिलेल्या गळ्यातील मंगळसुत्र एका चोरट्याने खेचून नेल्याची घटना कॅमेरात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ तुम्हाला दिसेल की एक महिला भर रस्त्यावर रील बनवत होती. व्हिडीओ तुम्हाला ती चालताना दिसेल. तिच्या विरुद्ध दिशेने अचानक एक दुचाकीस्वार येतो आणि तिच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढून नेतो. या दुचारीस्वार चोरट्याचा चेहरा दिसत नाही कारण त्याने हेल्मेट घातलेले असते. गळ्यातील मंगळसुत्र ओढताच महिला जोराने ओरडते. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

UP Congress ने हा व्हिडीओ शेअर केला असून आदित्यनाथ सरकारवर टिका केली आहे. हा व्हिडीओ उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद शहरातील आहे. व्हिडीओ शेअर करत काँग्रेसनी लिहिलेय, “आदित्यनाथ सरकार की जंगलराज! गाझियाबाद मध्ये रील बनवताना भरदिवसा एक महिलेच्या अंगावरील दागिना चोरून ओढून एका चोरटा फरार झाला.
देशाच्या गृहमंत्र्यांना हा व्हिडीओ दाखवला पाहिजे. प्रत्येक प्रकरणात अपयशी ठरणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागितला पाहिजे. महिला रात्री १२ वाजता दागिने घालून घराच्या बाहेर पडू शकतात, गृह मंत्री यांचे हे विधान कितपत खरे आहे, हे तुम्हाला समजेल.”

हेही वाचा : बापरे! लॅपटॉप उघडून भर रस्त्यावर स्कुटी चालवत होता तरुण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भाऊ आयटी कंपनीत..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मग फे लोक म्हणतात पेट्रोल हजार रुपये लीटर असो, मत भाजपलाच देणार. यांना काय फरक पडणार. हे लोक अशी चोरी करतात आणि नंतर भाजप यांना वाचवते” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ खोटा आहे. ही एक रिल आहे. दुचाकीचा नंबर दिसतोय”