Viral Video : भारतात दरदिवशी हजारो लोकं रेल्वेनी प्रवास करतात. सण उत्सवादरम्यान रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सोशल मीडियावर रेल्वेतील गर्दीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेमध्ये एवढी गर्दी दिसून येत आहे की काही प्रवाशांना चक्क रेल्वेच्या शौचालयात उभं राहून प्रवास करावा लागत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे, काही लोकांना रेल्वेच्या डब्यात चढायला जागा नाही तर काही लोकांना उभे राहायला जागा नाही. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही लोकं चक्क रेल्वेतील शौचालयात उभे किंवा बसलेले दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओत तुम्हाला रेल्वेच्या खिडकीजवळ एक व्यक्ती उभी असलेली दिसेल पुढे खिडकीतून आतमध्ये शौचालयात या व्यक्तीसह अन्य लोकं सुद्धा सामानाबरोबर बसलेले किंवा उभे असलेले तुम्हाला दिसतील. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हायरल व्हिडीओ लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनवरील आहे.

हेही वाचा : VIDEO : खरंच शेतकरी आंदोलनासाठी मॉडिफाइड ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे का? जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागील सत्य

सणासुदीला रेल्वेमध्ये गर्दी असणे, ही सामान्य गोष्ट आहे पण इतक्यात कोणतेही सण नसताना एवढी गर्दी पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे आणि याबाबत योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहेत. Railway Seva या अधिकृत अकाउंटवरून रेल्वेनी याबाबत आवश्यक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे

Railway Seva

या आठवड्याच्या सुरुवातीला रेल्वेतील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला. YNRK-HWH एक्सप्रेसनी प्रवास करताना एका तरुणीला त्रास सहन करावा लागला. एका प्रवासी तिच्या सीटवर बसला. जेव्हा या तरुणीने सीटवरून उठण्यास सांगितले तेव्हा प्रवाशाने नकार दिला. जेव्हा तिने रेल्वेला या संदर्भात माहिती दिली तेव्हा रेल्वेने तिला तात्काळ मदत केली.