भारतीय क्रिकेटपटू शुभमन गील त्याच्या उल्लेखनीय फलंदाजी कौशल्यासाठी ओळखला जातो आणि अनेकदा भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. शुभमन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. कधी सामन्यातील खेळीसाठी तर कधी त्याच्या रिलेशनशीपमुळे. मैदानाबाहेरही शुभमन गिलने अनेकदा चाहत्यांचे मने जिंकली आहेत. शुभमन नेहमी त्याच्या चाहत्यांबरोबर काही ना काही शेअर करत असतो. दरम्यान एका कमेंटमुळे सध्या तो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे शुभमनने त्याच्या चाहत्याच्या इंस्टाग्राम रिलवर कमेंट केली आहे. गिलने चाहत्याला मोलाचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

खरं तर गिलच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या एका चाहत्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मैदानावर क्रिकेट खेळणारा शुभमन गिल दिसत आहे. व्हिडिओमधील मजकूर असा आहे की, “जर शुभमनने या रीलवर कमेंट केली तर मी उद्यापासून अभ्यास सुरू करेन.” चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्याच्या आनंदासाठी, गिलने पोस्टवर कमेंट केली आणि “अभ्यास सुरू करा” असा सल्ला दिला.

हेही वाचा – एकेकाळी मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहत होती, आज आहे IAS अधिकारी! तस्कीन खानची यथोगाथा

गिलचा हा साधा पण हृदयस्पर्शी आणि नम्र स्वभाव लोकांना भावला आहे. एखाद्या चाहत्यांशी असा संपर्क साधू शकतो हे पाहून नेटकऱ्यांना त्याचे कौतूक वाटत आहे.

गिलच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या चाहत्याने आणखी एक पोस्ट करून त्यांचा आनंद शेअर केला व कृतज्ञता व्यक्त केली . पोस्ट शेअर करताना चाहत्याने, “माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस” असे कॅप्शन दिले.

हेही वाचा – अवघ्या ४ महिन्यांची कैवल्या ओळखते भाज्या, चित्रे, प्राणी, पक्षींसह १२० वस्तू! स्वत:च्या नावे केला जागतिक विक्रम

शुभमन गिल, जो सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तो नेहमीच त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे चर्चेत असतो. भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजयात महत्त्वाचा खेळाडू असण्यापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यापर्यंत, गिलचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे.