एखाद्या व्यक्तीला घरी प्राणी पाळायचा असेल तर साधारण त्यांच्या मनात मांजर, कुत्रा एखादा ससा किंवा पोपट यांसारख्या प्राण्यांचा-पक्षांचा विचार येतो. मात्र, सध्या एक भलताच ट्रेंड आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तो म्हणजे, जंगली किंवा हिंस्त्र श्वापदे पाळणे. होय, सध्या वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या जंगली जनावरांना पाळणे समाजात तुम्हाला अधिक मान मिळवून देतो, असे समजले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अशाच एका पाळीव सिंहाच्या शावकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार, एक पर्यटक थायलंडमधील पट्टाया या शहरात बेन्टली ही अत्यंत महागडी गाडी फिरवत आहे. या पांढऱ्या रंगाच्या उघड्या/ओपन गाडीत मागच्या सीटवर साधारण चार ते पाच महिन्याच्या सिंहाच्या शावकाला गळ्यात पट्टा बांधून बसवले आहे असे दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, या अशा स्टंटवर तेथील राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिली असल्याची माहिती, एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : Viral video : “गरम गरम, मसालेवाली..” चहाप्रेमींनो हे गाणे ऐकले का? पाहा विक्रेत्याचा ‘हा’ सांगीतिक अंदाज…

सर्वप्रथम फेसबुक या सोशल मीडिया माध्यमावरून डिसेंबर २०२३ मध्ये हा व्हिडीओ शेअर झाला आहे. यामध्ये दिसणारे सिंहाचे शावक पांढऱ्या रंगाच्या सिंहाच्या जातीचे असून, त्याचे वय हे केवळ चार ते पाच महिने असू शकते, असे तेथील स्थानिक अहवालानुसार समजते.

राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभागानुसार, सावंगजीत कोसूननर्न या व्यक्तीला, या सिंहाच्या शावकाला पाळण्याची परवानगी अधिकृतपणे दिली असली, तरीही त्याला परवानगीशिवाय इतर कुठेही घेऊन जाऊ शकत नाही असे समजते. मात्र, त्या व्यक्तीने विनापरवाना या प्राण्याला बाहेर नेले असल्याने, त्या व्यक्तीस सहा महिन्यांसाठी कारावास किंवा ठराविक रकमेचा दंड भरावा लागेल, असे त्या विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे. गाडी चालवणारी व्यक्ती ही भारतीय असून राष्ट्रीय उद्यान अधिकारी सध्या त्या व्यक्तीच्या शोधात आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय म्हटले आहे ते पाहा :
काही जण ‘मुक्या जनावराला उगाच कशाला त्रास देत आहे’ अशाप्रकारे चर्चा करत आहेत, तर काहींनी ‘जंगली जनावरांना असे मनुष्यवस्तीत फिरवणे सर्वांसाठीच धोकादाय आहे’, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर “सर्व जंगली प्राणी हे कोणत्याही क्षणी, कुणावरही हल्ला करू शकतात; त्यामुळे जरी असे प्राणी पाळण्याची परवानगी असली तरीही त्यांना घरात किंवा बंद खोलीतच ठेवायला हवे”, असे एकाने लिहिले आहे.”

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमावरून @bangkokboy17 या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of tourist riding with white lion cub in bentley car on roads went viral on social media dha
First published on: 25-01-2024 at 15:53 IST