Premium

महिलेनं केलं धाडस! हेलिकॉप्टर हवेत असताना मारली उडी; थरारक VIDEO झाला व्हायरल

Viral video: महिलेनं केलं अनोखं धाडस! हवेत हेलिकॉप्टर असताना मारली उडी

Women Back Flip From Helicopter Dangerous Stunt Video
उडत्या हेलिकॉप्टरला उलटं लटकून महिलेनं केली स्टंटबाजी

Stunt video: आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण वेगवेळे स्टंट करत असतात. शिवाय ज्या लोकांना स्टंट करण्याची आवड असते ते इतरांपेक्षा वेगळा आणि धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण कधीकधी हे लोक असे काही जीवघेणे स्टंट करतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका महिलेने केलेल्या भयानक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. तिनं चक्क उडत्या हेलिकॉप्टरला उलटं लटकून खतरनाक स्टंटबाजी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. याची अनेक उदाहरणे रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये पहायला मिळतातच. मात्र हे कधीकधी जिवावर बेतू शकतं याचा विचार करत नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला कोणत्याही सुरक्षेशिवाय हेलिकॉप्टरमधून खाली पाण्यात उडी मारत आहे. ही नॉर्मल उडी नाहीये, तर हॅलिकॉप्टरला लटकून मग बॅक फ्लिप मारत तिनं पाण्यात उडी मारली आहे. एवढ्या उंचावर हॅलिकॉप्टरमधून हा स्टंट करणं सोपं नाहीये मात्र या महिलेनं स्टंट मारुन दाखवलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> या ७ डॉक्टरांचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल; केलं असं काही की…

हा धक्कादायक आणि भयानक स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ellietsmart नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.  परंतु असे स्टंट करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याच्या कमेंट्स नेटकरी व्हिडीओवर देत आहेत. तर अनेकजण त्याच्या धाडसाचं कौतुक देखील करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women back flip from helicopter dangerous stunt video viral news in marathi srk

First published on: 07-12-2023 at 15:28 IST
Next Story
“माणुसकी अजूनही जिवंत आहे!” चेन्नईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांचा व्यक्तीने वाचवला जीव; लोकांनी केले कौतूक