News Flash

इव्हेंट मॅनेजमेन्ट

इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांची आणि करिअर संधींची सविस्तर ओळख-

| June 1, 2015 12:52 pm

इव्हेन्ट मॅनेजमेन्ट हे क्षेत्र आता अतिशय सुसंघटित, तांत्रिकदृष्टय़ा प्रगत आणि व्यावसायिक बनले आहे. इव्हेंट मॅनेजमेंटची सेवा सांस्कृतिक, व्यक्तिगत आणि संस्थात्मक स्तरांवर घेतली जाते.
पुरस्कार सोहळे, फॅशन आणि सेलिब्रेटी शोज, चित्रपट पुरस्कार, रोड शोज, cr01संगीताचे कार्यक्रम, कॉर्पोरेट सोहळे (बठका, कंपन्यांची चर्चासत्रे), लग्न समारंभ, कार्यशाळा, प्रदर्शने, वाढदिवस, थीम पार्टी, क्रीडा सामन्यांच्या अनुषंगाने होणारे कार्यक्रम, रिअ‍ॅलिटी शो, शैक्षणिक सोहळे (करिअर मार्गदर्शन जत्रा, महाविद्यालयातील वार्षकि मेळावे, गॅदिरग, वार्षकि क्रीडा स्पर्धा), चर्चासत्रे, प्रदर्शने, सौंेदर्य स्पर्धा, नृत्य-नाटय़, प्रश्नमंजूषा आदींच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे साहाय्य घेतले जाते.
अनेक कंपन्यांच्या विक्री आणि विपणनाच्या व्यूहनीतीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा ठळकरीत्या समावेश केला जातो. कंपन्यांच्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ अथवा मूल्यवृद्धी होण्याच्या दृष्टीने इव्हेंट्स म्हणजेच सोहळे आयोजित केले जातात. एखाद्या कंपनीचे ब्रँड मूल्य स्थापित करण्यासाठीही इव्हेंट्सचा प्रभावी उपयोग होतो, हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
करिअर संधी
कॉर्पोरेट हाऊसेस, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, स्पोर्टस् मार्केटिंग फम्र्स, इंटरनॅशनल स्पोर्टस् इव्हेन्ट्स, स्टार हॉटेल्स, क्लब हाऊसेस, रेडियो स्टेशन्स, जाहिरात कंपन्या, शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट्स, जनसंपर्क कंपन्या, टीव्ही वाहिन्या, मीडिया हाऊसेस, चित्रपट/ मालिका निर्मिती संस्था, शैक्षणिक संस्था, पर्यटन संस्था, सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स, फॅशन हाऊसेस, क्रीडा व्यवस्थापन, मार्केटिंग कंपनी या ठिकाणी इव्हेंट प्लॅनर, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, पब्लिक रिलेशन ऑफिसर, वेिडग प्लॅनर, अकाऊंट मॅनेजर, क्लायंट सíव्हसिंग मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, आर्टस्टि मॅनेजर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन मॅनेजर यासारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.
शैक्षणिक संस्था
त्त्    नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट- या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांत जाहिरात, माध्यम व्यवस्थापन, ब्रँड व्यवस्थापन, पर्यटन, विपणन, जनसंपर्क आणि इव्हेंट व्यवस्थापन या विषयांचा समावेश केला जातो. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
=    बीबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन- कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यवस्थापकांची आवश्यकता लक्षात घेत त्यानुसार या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
=    एमबीए इन इव्हेन्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन- कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील
पदवी उत्तीर्ण.
=    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅस्पेक्टस् ऑफ मीडिया, मार्केटिंग अ‍ॅण्ड इव्हेन्ट्स- कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर. या अभ्यासक्रमात व्यवस्थापकीय कौशल्य प्राप्त करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांना जाहिरात, विक्री, विपणन (मार्केटिंग), जनसंपर्क, माध्यम व्यवस्थापन आणि इव्हेंट व्यवस्थापन या क्षेत्रांचे ज्ञान मिळते. तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांचा इव्हेंट आयोजनात प्रभावी वापर करण्यासंदर्भात विशेषत्वाने प्रशिक्षण दिले जाते.
=    डिप्लोमा इन अ‍ॅस्पेक्टस् ऑफ मीडिया, मार्केटिंग अ‍ॅण्ड इव्हेन्ट्स- कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमात मार्केटिंग, अ‍ॅडव्हर्टायजिंग आणि मीडिया मॅनेजमेंट या तीन प्रमुख विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
=    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन- कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवीधर. हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात इव्हेंट साजरे करण्यासाठीचे तंत्र आणि कौशल्य शिकवण्यासोबतच  प्रात्याक्षिकांवर भर दिला जातो.
=    डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन- कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात विविध संस्था आणि मनोरंजनपर देखण्या सोहळ्यांच्या आयोजनासाठी आवश्यक ठरणारे तांत्रिक कौशल्य शिकवले जाते आणि मूलभूत माहिती दिली जाते.
    पत्ता- नॅशनल अकॅडेमी कॅम्पस, लॉर्डस् युनिव्हर्सल, टोपीवाला मार्ग, स्टेशन रोडच्या मागे, गोरेगाव (पश्चिम),
मुंबई- ४०००६२. वेबसाइट- www.naemd.edu.in
त्त्    नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट- या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
=    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग, मीडिया अ‍ॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट- कालावधी एक वर्ष.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
=    डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट – कालावधी- ११ महिने.
=    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट- कालावधी- ११ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. तिन्ही अभ्यासक्रम मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये करता येतात.
    पत्ते : १. तळमजला, नंदनवन बििल्डग, वल्लभभाई आणि अन्सारी रोड, विलेपाल्रे (पश्चिम), मुंबई- ४०००५६. ईमेल- support@niemindia.com २. ४, कमलप्रभा अपार्टमेंट्स, पोलीस मदानाच्या बाजूला, फग्र्युसन कॉलेज रोड, शिवाजी नगर, पुणे- ४११०१६.
    ईमेल- niem.events@gmail.com ३. १८, स्टार टॉवर, पाच बंगला, शहापुरी, कोल्हापूर- ४१६००१.
    वेबसाइट-  www.niemindia.com
त्त्    इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ लìनग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड डेव्हलपमेंट- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इंटिग्रेटेड प्रोग्रॅम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्ल्कि रिलेशन हा पर्याय स्वीकारता येतो. दुसऱ्या वर्षांनंतर एम.बी.ए. इन इव्हेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन आणि चौथ्या वर्षांनंतर पीएच.डी. इन इव्हेंट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन हा पर्याय स्वीकारता येतो. विद्यार्थ्यांना यातील प्रत्येक टप्प्यावर अभ्यासक्रम सोडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम मेवाड विद्यापीठाशी संलग्न आहे.
    पत्ता- नॅशनल एक्स्प्रेस वे- ८, एट आयपी सेक्टर- ३४, गुरगाव- १२२००१ हरियाणा. ईमेल- ्रल्लऋ@्रल्ल’ीं.्रिल्ल
नया है यह!
एम.बी.ए. इन फॅमिली बिझनेस अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्युरशिप-
हा अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (निरमा युनिव्हर्सटिी)ने सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे.
अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- डेप्युटी रजिस्ट्रार, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सटिी, एस. जी. हायवे, अहमदाबाद- ३८२४८१.
ईमेल- admissions.im@nrmauni.ac.in
वेबसाइट-  nrmauni.ac.in

-सुरेश वांदिले – ekank@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:52 pm

Web Title: event management 3
Next Stories
1 केंद्रीय विद्यापीठांचे अभ्यासक्रम
2 छायाचित्रणातील संधी
3 ऊर्जेसंबंधित अभ्यासक्रम
Just Now!
X